Pachod crime : विवाहितेच्या मृत्यूप्रकरणी चौघांवर गुन्हा, नांदरची घटना : आत्महत्येस प्रवृत्त केल्याने घेतले ताब्यात

Pachod crime : नांदर (ता. पैठण) येथील २० वर्षीय गर्भवती विवाहितेच्या आत्महत्येप्रकरणी तिच्या पतीसह सासू, सासरा, आणि नणंदविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हुंडा न दिल्याने शारीरिक व मानसिक छळ केल्याच्या आरोपामुळे चौघांना पाचोड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
Pachod crime
Pachod crimesakal
Updated on

पाचोड : नांदर (ता. पैठण) येथील वीस वर्षीय गर्भवतीच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी पाचोड पोलिसांनी पतीसह सासू, सासरा व नणंद यांच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या कलमाखाली गुन्हा दाखल करून त्यांना ताब्यात घेतले.

नांदर (ता. पैठण) येथील सानिया साहील पठाण हिचा मंगळवारी (ता.एक) सायंकाळी संशयास्पद मृत्यू झाला होता. तिच्या नातेवाइकांनी सासरच्या लोकांविरुद्ध आक्षेप घेतल्याने विवाहितेचा मृतदेह छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात पाठविला होता. अद्याप याप्रकरणी वैद्यकीय अहवाल प्राप्त झालेला नाही.

दरम्यान, शनिवारी (ता. पाच) मृत सानियाची आई परवीन राजू शेख (वय ४०, रा. एकतुनी, ह.मु. फारोळा, ता. पैठण) यांनी पाचोड पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हटले, की सानियाचा नऊ जानेवारी २०२२ रोजी नांदर येथील साहील सादीक पठाण याच्यासोबत विवाह झाला होता.

चार महिने चांगले वागविल्यानंतर साहील सादीक पठाण (पती), सुलताना सादीक पठाण (सासू), सादीक पठाण (सासरा) व सादीया पठाण (नणंद) यांनी लग्नात हुंडा न दिल्याने तिचा शारीरिक व मानसिक छळ सुरू केला. पैसे न दिल्यास वारसा हक्काने तिच्या वडिलाकडील जमिनीत वाटा मागण्यासाठी आग्रह करू लागले. या तक्रारीन्वये पोलिसांनी चौघांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून त्यांना ताब्यात घेतले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.