डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट अंतिम टप्प्यात

अपघातांपासून वाचण्यासाठी दक्षता, अहवालानंतर होणार दुरुस्तीची कामे
Dr Babasaheb Ambedkar Marathwada University buildings Structural audit
Dr Babasaheb Ambedkar Marathwada University buildings Structural auditsakal
Updated on

छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील ५७ पैकी ३० वर्षे जुन्या ५४ इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट पूर्ण होत आले आहे. या ऑडिटनंतर आलेल्या अहवालातील सूचनांआधारे इमारतीच्या दुरुस्तीची कामे हाती घेण्यात येणार आहेत. विद्यार्थी सुरक्षा आणि अपघातांपासून वाचण्यासाठी विद्यापीठाकडून ही दक्षता घेण्यात आली.

महापालिकेने ३० वर्षांपूर्वीच्या इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यासंबंधी जाहीर प्रगटन दिले होते. त्या अनुषंगाने विद्यापीठ परिसरातील ५७ इमारतींपैकी ३० वर्षे व त्यावरील आयुष्यमान असलेल्या इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट बहिस्थ संस्थांकडून करून घेण्यात आले. वर्ष २०१४-१५, त्यानंतर २०१९ आणि आता २०२४ नुसार इमारतींचे वयोमान ग्राह्य धरून हे ऑडिट करण्यात आले आहे. सध्या हे स्ट्रक्चरल ऑडिट शेवटच्या टप्प्यात आले आहे.

शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाने स्ट्रक्चरल ऑडिटसाठी असमर्थता दर्शविल्यानंतर त्रयस्थ संस्थेकडून हे ऑडिट पूर्ण करण्यात आले. यात ह्युमॅनिटी बिल्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट नागपूर येथील व्हीएनआयटी या संस्थेकडून करण्यात येत आहे.

Dr Babasaheb Ambedkar Marathwada University buildings Structural audit
Ramdas Athwale: आठवले यांच्या दौऱ्यापूर्वीच 'RPI'मधील वाद चौहाट्यावर! पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते राजीनामा देण्याच्या तयारीत

राज्याकडे ५० कोटींचा प्रस्ताव

विद्यापीठाकडून उच्च शिक्षण विभागाचे प्रधान सचिव यांच्याकडे अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर ५० कोटींचा प्रस्ताव पाठविण्यात आला. यामध्ये २०० मुलांचे १४ कोटींचे वसतिगृह, मुलींच्या ३ क्रमांकाच्या वसतिगृहाच्या वर एका मजल्याचे ५० मुलींसाठी साडेतीन कोटींचे विस्तारीकरण, धाराशिव उपपरिसरात १४.५ कोटींची एमबीएसाठी इमारत, विद्यापीठ परिसरातील रस्ते ८.५ कोटी, सुमारे १० कोटींच्या स्विमिंग पूल नूतनीकरणाचा या प्रस्तावात समावेश आहे. त्याला राज्य शासनाकडून मंजुरीची प्रतीक्षा आहे.

कुलगुरू आणि कुलसचिवांच्या मार्गदर्शनात २०१७-१८ मध्ये १, २०२१-२२ मध्ये १२, २०२२-२३ मध्ये १० आणि २०२४-२५ मध्ये १० इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले, तर तीन इमारती नव्या असल्याने त्यांचे ऑडिट करण्याची गरज नाही. ऑडिट रिपोर्टनुसार, आवश्‍यक दुरुस्तीची कामे हाती घेतली जातील.

- रवींद्र काळे, मुख्य अभियंता, मालमत्ता विभाग, विद्यापीठ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.