छत्रपती संभाजीनगर - डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने विविध विभागांत कंत्राटी पद्धतीने सहायक प्राध्यापकांची पदभरती केली खरी परंतु काही निवडी या ‘तोंड’ पाहून केल्याचा आरोप होत आहे. महत्त्वाचे म्हणजे विद्यापीठ प्रशासनाने आरक्षणानुसार रिक्त जागा भरणार असल्याचे जाहिरातीत नमूद केले. परंतु, पदभरती आरक्षणानुसार केली की गुणांनुसार, याचा विद्यापीठालाही ताळमेळ नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे ‘लाडक्या’ उमेदवाराचीच निवड करायची होती, तर परीक्षा का घेतली, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.