UPSC Result 2024 : अपयश पचवून मारला यशाचा चौकार! ; डॉ. स्नेहल वाघमारेंची ‘यूपीएससी’मध्ये चमक

मूळचे चांदेगाव (ता. उदगीर) येथील रहिवासी आणि सध्या गडचिरोली येथे असिस्टंट कमांडंट या पदावर कार्यरत असलेले डॉ. स्नेहल ज्ञानोबा वाघमारे यांनी अथक परिश्रम करून ‘यूपीएससी’मध्ये यश मिळविले आहे.
UPSC Result 2024
UPSC Result 2024sakal
Updated on

उदगीर : मूळचे चांदेगाव (ता. उदगीर) येथील रहिवासी आणि सध्या गडचिरोली येथे असिस्टंट कमांडंट या पदावर कार्यरत असलेले डॉ. स्नेहल ज्ञानोबा वाघमारे यांनी अथक परिश्रम करून ‘यूपीएससी’मध्ये यश मिळविले आहे. या परीक्षेत तीनवेळा मुलाखतीपर्यंत जाऊनही यश हुलकावणी देत होते. मात्र, खचून न जाता जिद्दीने प्रयत्न केले आणि त्यांनी यावेळी यश मिळविलेच. त्यांची रँक ९४५ वी आहे.

मी तीनवेळा मुलाखतीपर्यंत पोचूनसुद्धा अंतिम यादीत नाव न आल्याने निराश होत होतो. त्यावेळी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार नजरेसमोर यायचे. त्यातून जिद्दीने प्रयत्न केले पाहिजेत, अशी प्रेरणा मिळायची. त्यातच वडील, आई आणि बहिणीने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनातील कठीण प्रसंग सांगून माझे मनोबल वाढविले. दररोज सहा ते आठ तास अभ्यास केला. या प्रयत्नात पत्नीनेही साथ दिली, असे डॉ. स्नेहल यांनी सांगितले.

स्नेहलने लातूरच्या दयानंद महाविद्यालयात बारावीपर्यंत शिक्षण घेतले. त्यावेळी मागासवर्गीयांमध्ये राज्यात ते प्रथम आले होते. याबद्दल तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्यांचा सत्कार झाला होता. पुढे ‘एमबीबीएस’ची पदवी मिळविल्यानंतर २०२३ मध्ये केंद्रीय राखीव पोलिस दल (सीआरपीएफ) मध्ये असिस्टंट कमांडंट या पदावर नियुक्ती झाली. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी २०१७ पासून सुरू होती.

UPSC Result 2024
Nanded Loksabha Constituency : नांदेडमध्ये प्रचाराला उरले अवघे सहा दिवस

डॉ. स्नेहल यांचे वडील ज्ञानोबा वाघमारे हे मुंबईतील डॉ. भाभा अणुसंशोधन केंद्रातून फोरमेनपदावरून नुकतेच निवृत्त झाले आहेत. आई गृहिणी असून विवाहित बहीण बीई (इलेक्ट्रॉनिक्स) आहे. अत्यंत कठीण असणारी ही परीक्षा देण्यापूर्वी विद्यार्थ्यांनी प्रथम व्यावसायिक पदवी घ्यावी. या काळात ‘एनसीआरटी’ची पुस्तके वाचावीत. योग्य अभ्यासक्रमाची ऑनलाइन माहिती घ्यावी. नियमित सहा ते आठ तास अभ्यास केला, तरी यश मिळते. अभ्यासात सातत्य राहील, याकडे कटाक्ष असावा.

- डॉ. स्नेहल वाघमारे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.