दुष्काळी शेतीला ‘ड्रॅगन फ्रूट’चे वरदान, कोणत्याही कीडरोगावर मात

औरंगाबाद - गंगामाई कृषी उद्योगाकडून पैठण तालुक्यातील ब्रम्हगव्हाण येथे २४ एकरात, खाम जळगाव इथे ४७ तर गंगापूर तालुक्यातील हनुमंतगाव येथे १ एकरात ड्रॅगन फ्रूटची लागवड करण्यात आली आहे.
औरंगाबाद - गंगामाई कृषी उद्योगाकडून पैठण तालुक्यातील ब्रम्हगव्हाण येथे २४ एकरात, खाम जळगाव इथे ४७ तर गंगापूर तालुक्यातील हनुमंतगाव येथे १ एकरात ड्रॅगन फ्रूटची लागवड करण्यात आली आहे.
Updated on

औरंगाबाद : अवर्षणप्रवण मराठवाड्यात (Marathwada) सतत निसर्गाचा लहरीपणा दिसून येतो. अशा परिस्थितीत कोरडवाहू शेतीला शाश्‍वत उत्पन्नासाठी पारंपरिक पिकांसोबतच वेगळ्या पिकांची लागवड करण्याची गरज निर्माण झाली आहे. सध्या कोरडवाहू क्षेत्रासाठी ड्रॅगन फ्रूटची (Dragon Fruit In Aurangabad) लागवड फायदेशीर ठरत आहे. या फळपिकाचे उत्तम मॉडेल गंगामाई कृषी उद्योगाने तयार केले आहे. या उद्योगाने तब्बल ७२ एकरात ड्रॅगन फ्रूटची लागवड केली असून या फळपिकाला जागेवरच खरेदीदार लाभत आहेत. कमी पाणी, कोणत्याही प्रकारचा किड रोग नसल्याने ड्रॅगन फ्रूट दुष्काळी भागातील शेतीसाठी वरदान ठरत आहे. या फळामध्ये प्रोटीनचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे अनेक आजारांपासून आपली सुटका होते. तसेच शरीरातील कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यासाठी आणि रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी ते फायदेशीर ठरते. त्याचप्रमाणे शरीरातील साखरेचे प्रमाण नियंत्रीत ठेवण्यासोबतच पचनक्रिया सुरळीत करण्यासाठीही मदत होते. गंगामाई कृषी उद्योगाकडून पैठण (Paithan) तालुक्यातील ब्रम्हगव्हाण येथे २४ एकरात, खाम जळगाव इथे ४७ तर गंगापूर (Paithan) तालुक्यातील हनुमंतगाव येथे १ एकरात ड्रॅगन फ्रूटची लागवड करण्यात आली आहे.

औरंगाबाद - गंगामाई कृषी उद्योगाकडून पैठण तालुक्यातील ब्रम्हगव्हाण येथे २४ एकरात, खाम जळगाव इथे ४७ तर गंगापूर तालुक्यातील हनुमंतगाव येथे १ एकरात ड्रॅगन फ्रूटची लागवड करण्यात आली आहे.
मराठवाड्यात बुलेट ट्रेनसाठी करणार पाठपुरावा - अशोक चव्हाण

बारा वर्षापर्यंत चांगली फळधारणा

अजित सीडसचे उपसरव्यवस्थापक बबन अनारसे यांनी सांगितले, की हे उष्णकटीबंधीय फळ आहे. मेक्सिको याचे मूळ आहे. आपल्याकडे या फळाला पूरक वातावरण आहे. सप्टेंबर २०१९ मध्ये हनुमंतगाव येथील शेतीत एका एकरात याची लागवड करण्यात आली. एका एकरात ४५० पोल्सवर प्रत्येकी ४ रोपे लावली आहेत. प्रत्येक पोलला पहिल्यावर्षी २ ते ३ किलो शेणखत, १०० ग्रॅम एनपीके दिल्याने चांगला परिणाम झाला. दुसऱ्या वर्षी प्रति पोल १० किलो शेणखत दिले. ११ ते १२ महिन्यात फळे येतात. मात्र चांगली फळे येण्यासाठी दोन वर्ष लागतात. या एका एकरातील पहिल्यावर्षी एका पोलवर जवळपास ३ ते ४ किलो फळे लागली. कमीत कमी बारा वर्षापर्यंत फळधारणा होत राहते.

औरंगाबाद - गंगामाई कृषी उद्योगाकडून पैठण तालुक्यातील ब्रम्हगव्हाण येथे २४ एकरात, खाम जळगाव इथे ४७ तर गंगापूर तालुक्यातील हनुमंतगाव येथे १ एकरात ड्रॅगन फ्रूटची लागवड करण्यात आली आहे.
औरंगाबादेत शिवसेनेने प्रतीकात्मक कावड यात्रा काढून जपली परंपरा

अर्ध्या किलोहून जास्त वजनाचे फळ

समन्वयक मोहन तपसे यांनी सांगितले, की खामजळगाव शिवारातील शेतात यंदा ड्रॅगन फ्रूटची लागवड करण्यात येत आहे. जम्बो रेड आणि मलेशियन पर्पल या दोन जातीची गंगामाई कृषी उद्योगच्या शेतात लागवड करण्यात आली आहे. जम्बो रेड व मलेशियन पर्पलचा आकार चांगला असतो. ५०० ते ७०० ग्रॅमपर्यंत फळ पोसते. मात्र, मलेशियन पर्पलला थोडा चांगला भाव मिळतो. ड्रॅगन फ्रूटच्या पानांतच पाणीसाठवण क्षमता असल्याने याला उन्हाळ्यातदेखील फारसे पाणी द्यावे लागत नाही. झाडांच्या गरजेनुसार आठ दिवसांतून थोडे थोडे पाणी दिले तरी चालते. दोन रोपातील अंतर दिड फुट तर दोन ओळीतील अंतर एक फुट ठेवण्यात आले आहे. लागवडीपूर्वी मातीपरिक्षण करून घेतले.

औरंगाबाद - गंगामाई कृषी उद्योगाकडून पैठण तालुक्यातील ब्रम्हगव्हाण येथे २४ एकरात, खाम जळगाव इथे ४७ तर गंगापूर तालुक्यातील हनुमंतगाव येथे १ एकरात ड्रॅगन फ्रूटची लागवड करण्यात आली आहे.
नांदेड-मनमाड रेल्वेमार्गाचे दुहेरीकरण पूर्ण करू: भागवत कराड
पद्माकरराव मुळे, चेअरमन, गंगामाई कृषी उद्योग
पद्माकरराव मुळे, चेअरमन, गंगामाई कृषी उद्योग

यावर्षी ७२ एकरांवर ड्रॅगन फ्रुटची लागवड सुरु असून येणाऱ्या काळात अजून २५ एकरांवर लागवडीचे नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये जम्बो रेड आणि मलेशियन पर्पल रेड जातीचा समावेश आहे. सेंद्रीय शेती, समतोल नैसर्गिक खतांचा वापर करून कृषी उत्पादनावर आमचा भर आहे. सोलरद्वारे ऊर्जानिर्मिती तसेच सहा मोठे शेततळे असून सहा कोटी लीटरपेक्षा जास्त लिटर पाणी साठवणूक केली आहे. पाणी जरी मुबलक असले तरी पाण्याचा अतिशय जपून वापर केला जातो, ठिबक सिंचनाद्वारे पिकांना पाणी दिले जाते.

- पद्माकरराव मुळे, चेअरमन, गंगामाई कृषी उद्योग

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()