Bio-Fertilizer: शेणखताला आले ‘सोनेरी दिवस’

Bio-Fertilizer: रासायनिक खतामुळे जमिनीचा पोत खालावल्याने शेतकरी शेणखताच्या वापरावर भर देत आहेत.
Manure
ManureSakal
Updated on

Bio-Fertilizer: मागील काही वर्षांपासून शेतकऱ्यांनी शेतमालाचे उत्पादन वाढविण्याच्या नादात शेतामध्ये रासायनिक खतांचा उपयोग वाढविला आहे. त्यामुळे पिकांचा लागवड खर्च वाढला असून उत्पादन मात्र घटत चालले आहे.

रासायनिक खतामुळे जमिनीचा पोत खालावल्याने शेतकऱ्यांना नवीन समस्येला तोंड द्यावे लागत आहे. यातून मार्ग काढण्यासाठी शेतकरी आता पूर्वीप्रमाणे शेणखताच्या वापरावर भर देत आहेत. एकीकडे गुरांचे प्रमाण कमी झाल्याने व दुसरीकडे मागणी वाढत असल्याने शेणखताला चांगली किंमत मिळत आहे.

या तुटवड्यामुळे सद्यःस्थितीत शेणखताला 'सोनेरी दिवस' आल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली असून, शेतकरी अन् पशुपालकांनाही आर्थिक उत्पन्न मिळू लागले आहे. खरीप हंगाम अवघ्या काही दिवसांवर आला. शेतकरी सध्या शेतमजुरांसह मशागतीच्या कामाला लागला आहे.

वाढलेल्या रासायनिक खतांच्या किंमती, चढ्या भावाने होणारी विक्री, वेळेवर न होणारा पुरवठा आदी कारणांमुळे परिसरातील शेतकरी शेणखताकडे वळले आहेत. पावसाळ्यापूर्वी शेतात शेणखत टाकण्यावरही अनेकांनी भर दिला आहे. रासायनिक खतापेक्षा शेणखत सरस आहे. याचा कोणताही दुष्परिणाम पिकांवर व जमिनीवर होत नाही. उत्पादनात मोठी वाढ होण्यासह जमिनीची सुपिकता टिकून जमिनीचा पोत सुधारत असल्याने परिसरातील शेतकरी शेणखत खरेदीसाठी धावपळ करीत आहेत.

Manure
Gold Hallmark Center: प्रत्येक तालुक्यात हवे ‘हॉलमार्क सेंटर’

शेणखत मिळविण्यासाठी धावपळ

परिसरातील बजाजनगर, वळदगाव, पाटोदा, वडगाव कोल्हाटी, रांजणगाव शेणपुंजी, पंढरपूर, सुलतानपूर शिवारातील हजारो एकर शेती विविध प्रकल्पांच्या नावाने शेतकऱ्यांच्या हातातून गेली. पशुधनाअभावी दिवसेंदिवस शेणखताचा साठा कमी होत आहे. जनावरांची संख्या रोडावल्याने शेणखत कमी प्रमाणात उपलब्ध आहे. उपलब्ध खत खरेदीसाठी शेतकऱ्यांची चढाओढ सुरू आहे.

शेणखत फायदेशीर

रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे जमिनीचा पोत खालावला असून, उत्पादकता कमी झाली आहे. अत्यंत फायदेशीर असून या खताचा वापर शेतजमिनीत झाल्यास शेतजमिनीचा पोत सुधारतो. दर्जेदार उत्पादनासाठी शेणखत फायदेशीरच आहे.

ट्रॉली महागच

शेणखत सहसा ट्रॅक्टरच्या ट्रॉलीप्रमाणे खरेदी केले जाते. पशुधनात होणाऱ्या घटीमुळे शेणखताला सध्या सोनेरी भाव आला आहे. एक ट्रॅक्‍टर ट्रॉली शेणखतासाठी चक्क दीड हजार रुपये मोजावे लागत आहेत. चांगल्या कुजलेल्या शेणखताच्या एका ट्रॅक्टर ट्रॉलीला तर अडीच ते तीन हजार रुपये मोजावे लागत आहेत. सोबतच शेणखताचा ढिगारा आणि शेती यामधील अंतरासाठी सुद्धा शेतकऱ्यांना ट्रॅक्टर मालकांना प्रति ट्रॉली ५०० ते १००० रुपये अधिकचे मोजावे लागत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.