‘म्युकोरमायकोसिस’चा वेळीच ओळखा धोका

पोस्ट कोविडनंतर घाटीत येण्याचे प्रमाण वाढले
mucormycosis
mucormycosismucormycosis
Updated on

औरंगाबाद: कोविडमधून बरे झालेल्या काही रुग्णांत ‘म्युकोरमायकोसिस’ (mucormycosis) हे ‘फंगल इन्फेक्शन’ (fungal infection) आढळत आहे. ते नवीन नाही; परंतु हल्ली कोरोनामुळे प्रतिकारशक्ती तसेच उपचारादरम्यान स्टिरॉईड्सचा मारा यामुळे अनियंत्रित मधुमेहातील रुग्णांमध्ये ‘म्युकोरमायकोसिस’ हा बुरशीजन्य आजार वाढत आहे. अनियंत्रित मधुमेह रुग्णांत ‘म्युकोरमायकॉसिस’मुळे मृत्यूचे प्रमाण ४०- ८० टक्क्यांपर्यंत असून घाटीतही या आजाराचे रुग्ण तक्रारी घेऊन येत आहेत.

‘फंगल इन्फेक्शन’मुळे काही रुग्णांची दृष्टी कमकुवत झाली. काहींमध्ये नाक आणि जबड्याचे हाड काढून टाकावे लागण्याचीही भीती आहे. ‘म्युकोरमायकोसिस’मुळे काही रुग्णांना मृत्यूचा धोकाही वाढताना दिसत आहे. तोंडाच्या एका बाजूला सूज येणे, डोळ्याच्या बाजूला सूज, डोकेदुखी, नाकाला सूज, सायनस रक्तसंचय अशी लक्षणे दिसून येत आहेत.

mucormycosis
दिलासादायक! मराठवाड्यात रुग्णसंख्या पाच हजारांच्या आत; मृत्यूदरही घटला

असा पसरतो म्युकोरमायकोसिस
श्वासोच्छवास आणि त्वचेच्या माध्यमातून रोगजंतू शरीरात प्रवेश करतात. वेगवेगळ्या अवयवांचे ते नुकसान करतात. ‘म्युकोरमायकोसिस’ मेंदू, नाक, सायनस म्हणजेच हवेच्या पोकळ्यांमध्ये वाढते. सुरवातीला हे लक्षात येत नाही. मात्र चेहरा नाक डोळ्याला हळू हळू सूज येताच या ‘फंगल इन्फेक्शन’चे तात्काळ निदान करून उपचार करणे गरजेचे आहे.

हे आहेत उपचार

1. डोळे, गाल आणि अनुनासिक अडथळा किंवा काळ्या कोरड्या कवचाची सूज आल्यावर ‘अँटीफंगल’ औषधी त्वरित सुरू करावी.

2. ‘अँटी फंगल’ औषोधपचार आणि शस्त्रक्रियेद्वारे वेळीच उपचार झाल्यास कान, नाक, डोळे वाचवण्यात डॉक्टरांना यश येऊ शकते.

3. काही रुग्णांत पुढच्या टप्प्यातील या ‘इन्फेक्शन’ मुळे हाडांची झीज झाल्याने व ‘इन्फेक्शन’ नजीकच्या भागात, मेंदू पर्यंत पसरू नये यासाठी शस्त्रक्रिया करून झीज झालेले हाड काढावे लागते त्यात लगतचा अवयव गमवावा लागतो.

4. कोविडपासून मुक्त झाल्यानंतर नियमित व्यायाम, मधुमेहावर नियंत्रण मिळविण्यासाठी योग्य औषोधपचार, सोबत सकस आहार घ्या.

mucormycosis
रमजान ईदचा बाजार फुलणार, जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी

‘‘कोविड संसर्ग आणि मधुमेह एकत्र आले, की दुय्यम संसर्ग (बॅक्टरीअल आणि फंगल) होण्याचे प्रमाण वाढते. कोविडमुळे शरीराची कमी झालेली प्रतिकारशक्ती, स्टिरॉइड्सचा अयोग्य वापर, इतर प्रतिकार शक्ती कमी करणारे औषधे (टॉसिलिजिमॅब) व प्रतिजैवकांचा वापराने ‘म्युकॉरमायकोसिस’ झपाट्याने वाढत आहे.
-डॉ. सुनील देशमुख प्राध्यापक आणि विभाग प्रमुख.

‘‘कोविड उपचारानंतर मधुमेही रुग्णांमध्ये ‘म्युकोरमायकोसिस’ची लक्षणे आमच्या ओपीडीमध्ये दिवसभरात येणाऱ्या १०-१५ रुग्णांत दिसून येतात. रुग्णांनी काळजी घेणे महत्त्वाचे आहे. वेळीच निदान, उपचार हाच उपाय आहे.
- डॉ. वसंत पवार कान- नाक- घसातज्ज्ञ, घाटी.

‘‘म्युकोरमायकोसिस हा बुरशीजन्य आजार एकदा पसरला, की त्यावर परिणामकारक उपचार करणे अवघड होते. त्यामुळे तात्काळ निदान अत्यावश्यक आहे. आजाराला आळा घालण्यासाठी शरीरातील साखर उत्तम प्रकारे नियंत्रणात ठेवणे गरजेचे आहे.’’
- डॉ. सोनली जटाळे, सहायोगी प्राध्यापक, कान- नाक- घसातज्ज्ञ, घाटी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.