सात महिन्यांत तब्बल ८० रुपयांनी वाढल्या खाद्यतेलाच्या किंमती

महिनाभरात लिटरमागे पुन्हा पाच ते दहा रुपयांची दरवाढ
edible oil
edible oiledible oil
Updated on

औरंगाबाद: वर्षभरापासून खाद्यतेलाच्या दरवाढीचा भडका सुरुच आहे. दिवाळीत शंभरीच्या आत असलेल्या खाद्यतेलाच्या किंमती आता १८० ते २०० रुपये लिटरपर्यंत येऊन पोचल्या आहेत. येत्या आठवड्यात पुन्हा वाढ होण्याची शक्यता तेल विक्रेत्यांनी वर्तवली आहे.

पेट्रोल-डिझेलच्या किंमतीविषयी राजकीय पक्षांच्यावतीने आंदोलन करण्यात येत आहे. मात्र, खाद्यतेलांच्या किंमतीविषयी कोणीच काही बोलत नाही. दरवर्षी मार्च महिन्यात नवीन धान्य येत असल्याने करडईसह इतर तेलांच्या किंमतीचे दर कमी होतात. यंदा करडीचे दर तीन ते चार रुपयांनी कमी झाले. मात्र करडई तेलाचे दर दोनशे रुपये लिटरपर्यंत गेले आहेत. येत्या आठवड्यात सर्वच तेलांच्या किंमतीत चार ते पाच रुपयांची वाढ होणार असल्याची माहिती विक्रेत्यांनी दिली.

edible oil
औरंगाबादेत कोरोनाकाळातही महापालिका कर्मचारी पगारीविना

आंतराराष्ट्रीय स्तरावर तेलांच्या किंमतीत वाढ झाल्यामूळे खाद्यतेलांच्या किंमतीत वाढ होत आहे. सततच्या दरवाढीमुळे सर्वसामान्यांना मोठी झळ बसत आहे. यामुळे महिन्याच्या बजेटमध्येही दुप्पटीची वाढ झाल्याची प्रतिक्रीया खाद्यतेल विक्रेते विनोद चौंडिये यांनी दिली.


तेल---------------लिटर (सुटेतेल)

पामतेल-------------१३८ ते १४२ रुपये
सोयाबीन------------१५५ ते १५८रुपये
सूर्यफूल------------१६८ ते १७० रुपये
शेंगदाणा------------१७५ ते १८८ रुपये
करडई--------------१९५ ते १९८ रुपये

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.