उस्मानाबाद : सिंचन प्रकल्पाच्या समस्या सोडविण्याचे प्रयत्न ; अतुल कपोले

अतुल कपोले यांचे आश्वासन; कृष्णा-मराठवाडा प्रकल्पाच्या कामांचा आढावा
Efforts to solve irrigation project problems Atul Kapole
Efforts to solve irrigation project problems Atul Kapolesakal
Updated on

उस्मानाबाद : जलसंपदा विभागाचे सहसचिव अतुल कपोले यांनी कृष्णा- मराठवाडा सिंचन प्रकल्पाला शुक्रवारी (ता. ४) भेट देऊन प्रकल्पाच्या कामाचा आढावा घेतला. प्रकल्पातील अडचणी जाणून घेत त्याचे निराकरण करण्यासाठी शासनस्तरावर सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येतील, असे आश्वासन दिले.

उपसासिंचन क्रमांक दोन अंतर्गत नळदुर्ग बॅरेज क्रमांक एक व नळदुर्ग बॅरेज क्रमांक दोन या प्रकल्पास भेट दिली. तिथे पाहणी करून प्रकल्प पूर्ण करण्यासाठी योग्य ती कारवाई लवकर करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.२००१ साली मराठवाड्याच्या कृष्णा खोऱ्यातील या भागात नैसर्गिकरित्या उपलब्ध होणाऱ्या एकूण २५ अब्ज घन फूट पाण्याचा वापर वगळता कृष्णा खोऱ्याच्या उर्वरित भागातून २१ अब्ज घन फूट पाण्याचा वापर करण्यास अनुमती दिली आहे. शासनाने २००९ साली कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाच्या २३.६६ अब्ज घन फूट सुधारित जल नियोजनास मान्यता दिलेली असून, कृष्णा मराठवाडा प्रकल्पाला २३.६६ अब्ज घन फूट पाणी उपलब्ध करून देण्यात आले आहे.

कृष्णा पाणी तंटा लवादाच्या पाणीवापराच्या निर्बंधानुसार पाणी वापरास मर्यादा होत्या. या १४ अब्ज घन फूट पाण्यापैकी सात अब्ज घन फूट पाणी कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पास उपलब्ध करून देण्यात आले. प्रकल्पाचे काम दोन टप्प्यात करायचे असून, पहिला टप्पा सात अब्ज घन फूट पाणी वापरासाठी व दुसरा टप्पा १६.६६ अब्ज घन फूट पाणी वापराचा आहे. दोन टप्प्यात योजनेचे काम हाती घेण्याचे आदेश आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यासाठी उपसा सिंचन योजना क्रमांक एक व दोन तर बीड जिल्ह्यासाठी आष्टी उपसा सिंचन योजना क्रमांक तीन उपसा सिंचन योजनेचा समावेश आहे. त्यातील सिंचन योजना क्रमांक एक व दोनमध्ये उस्मानाबाद जिल्ह्यातील आठ तालुक्यांचा समावेश आहे.

यावेळी उपसा सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता प्रवीण चावरे, यांत्रिकी विभागाचे कार्यकारी अभियंता आर.जे. मोमीन, सहायक कार्यकारी अभियंता अमृत सांगळे, उप अभियंता बी.व्ही. सातपुते तसेच ठेकेदार मदन देशमुख उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()