Nanded news : कंधारला आठ हजार बालके आहारापासून वंचित

अंगणवाड्यांना टाळे : कर्मचाऱ्यांचा संप सुरूच
nanded
nandedsakal
Updated on

कंधार : अंगणवाडी कार्यकर्ती व मदतनीस यांना सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळावा यासह विविध मागण्यांसाठी तालुक्यातील ५४२ अंगणवाडी कार्यकर्ती, मदतनीस यांनी (ता.चार) डिसेंबरपासून बेमुदत संपाचे हत्यार उपसले आहे. या मुळे तालुक्यातील एक हजार ३६६ गरोदर माता, एक हजार ५६६ स्तनदा माता यांच्यासह आठ हजार २१९ लहान बालके गेल्या बारा-तेरा दिवसांपासून पूरक पोषण आहारापासून वंचित आहेत.

अंगणवाडी केंद्रामार्फत बालकांच्या आरोग्याची नियमित तपासणी केली जाते. अंगणवाडी केंद्रात लसीकरणही केल्या जाते. ही सर्व कामे अंगणवाडीच्या माध्यमातून दररोज करण्यात येतात. परंतू शासन मात्र अंगणवाडी कार्यकर्ती व मदतनीस यांच्या जिव्हाळ्याच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना अत्यंत तुटपुंज्या मानधनावर आपली उपजीविका भागवताना तारेवरची कसरत करावी लागते.

अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा देण्यात यावा, तोपर्यंत कार्यकर्तीना दरमहा २६ हजार रुपये तर मदतनीस यांना २० हजार रुपये मानधन मिळावे तसेच सर्वोच्च न्यायालयाने ग्रॅच्यूटीबाबत दिलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करावी यासह इतर मागण्यासाठी राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी वेळोवेळी आंदोलने, मोर्चे, निदर्शने करूनही शासन लक्ष देत नसल्यामुळे कर्मचाऱ्यांनी राज्यव्यापी बेमुदत संप पुकारला आहे. यात तालुक्यातील ३२० अंगणवाडी केंद्रावरील अंगणवाडी कार्यकर्ती व मदतनीस चार डिसेंबर पासून बेमुदत संपावर आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.