हिंस्र वन्यप्राण्याने ११ शेळ्यांचा पाडला फडशा, शेतकऱ्याचे मोठे नुकसान

हिंस्र वन्यप्राण्याने ११ शेळ्यांचा पाडला फडशा, शेतकऱ्याचे मोठे नुकसान
Updated on
Summary

वनविभागाने तात्काळ पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याची मागणी गावातील व परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे.

परतूर (जि.जालना) : तालुक्यातील (Partur) वरफळ येथील शेतकऱ्याच्या गोठ्यावर हल्ला करून हिंस्र वन्यप्राण्याने (Wild Animal) ११ शेळ्यांचा फडशा पाडल्याची घटना सोमवारी (ता.२४) सकाळी उघडकीस आली. वरफळ येथील शेतकरी (Farmer) शेख मुखीद शेख शेख मजीद यांचे गावालगतच जनावरांचा गोठा आहे. शेख मुखीद यांनी रविवारी रात्री (ता.२३) या गोठ्यात ११ शेळ्या बांधल्या. या गोठ्यात त्यांचे लहान भाऊ झोपले होते. सोमवारी सकाळी त्यांचे भाऊ उठल्यावर पाहिले असता गोठ्यात बांधलेल्या ११ पैकी ०९ शेळ्या मरण पावलेल्या अवस्थेत आढळून आल्या व अन्य दोन काही वेळाने त्यांनीही प्राण सोडले. गोठ्यातील दृष्यपाहून शेतकऱ्यास धक्काच बसला. (Eleven Goats Died In Wild Animal Attack In Partur Block)

हिंस्र वन्यप्राण्याने ११ शेळ्यांचा पाडला फडशा, शेतकऱ्याचे मोठे नुकसान
उद्धव ठाकरे, मोदींनी टिव्हीवर येताना गरिबांचाही विचार करावा: इम्तियाज जलील

गोठ्यातील ११ शेळ्यांचा हिंस्र वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाला. त्यांनी आरडाओरडा केला तेव्हा शेजारील शेतकरी धावत आले. गोठ्यातील जाळी तोडून शेळ्यांवर हल्ला झाला असावा असा अंदाज बांधला जात आहे. या हल्ल्यात शेतकऱ्याचे जवळपास १ लाख ५० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. संबंधित घटनेची माहिती पशूवैद्यकीय अधिकारी, पोलिस ठाणे व वनविभागाला याची माहिती देण्यात आली. त्यानंतर पोलिस प्रशासनाच्या वतीने पोलिस हेडकाॅन्स्टेबल डी.जे.शिंदे व महसूल विभागाच्या वतीने तलाठी अरुण कुलकर्णी, पशूवैद्यकीय अधिकारी श्री.सावन व वनविभागाच्या वतीने वनपाल एल.बी.घुगे, वनरक्षक युवराज शिंदे, वनसेवक शेख इसाक यांनी भेट देऊन पंचनामा केला. वनविभागाने (Forest Department) तात्काळ पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याची मागणी गावातील व परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे. दरम्यान,या घटनेमुळे गावात भीतीचे वातावरण परसलेले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.