कळंब तालुक्यातील हाॅटेलवर छापा, देशी-विदेशी मद्य जप्त

वाशीतील साई परिक्रमा लॉजवर छापा
वाशीतील साई परिक्रमा लॉजवर छापा
Updated on
Summary

परवानाधारक मद्यविक्रीची दुकाने बंद असतानाही तालुक्यातील प्रत्येक गावात तसेच रस्त्यावरील जेवणावळीच्या हॉटेलमधून सर्रासपणे बेकायदेशीररित्या मद्यविक्रीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले.

कळंब (जि.उस्मानाबाद) : तालुक्यातील (Kalamb) मोहा येथील हॉटेल वाडा येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने शुक्रवारी (ता.२८) छापा मारून १ लाख १० हजार रुपयांचे बेकायदा देशी- विदेशी (Liquor) मद्य विक्री करण्यासाठी साठवून ठेवलेले पकडले. उत्पादन शुल्क विभागाने (State Excise Duty Department) धाडसी कारवाई केल्याने कौतुक होत आहे. पोलिस प्रशासन अर्थपूर्ण संबंधामुळे कारवाई करीत नसल्याचा आरोप करण्यात येत आहे. कोरोना संसर्गामुळे शासनाने लॉकडाउन केले आहे. त्यामुळे शासनाला महसूल देणारी सर्व आस्थापने कुलूपबंद आहेत. मार्च महिन्यातच या आस्थापना व्यवस्थापकांनी आपले परवाने नूतनीकरणासाठी पैसे खर्च केले. त्यानंतर शासनाने कोरोनाची साखळी तोडण्यासाठी कडक निर्बंध लादले. त्यामुळे मद्यविक्रीची दुकाने बंद ठेवण्यात आल्याने प्रचंड नुकसानीस सामोरे जावे लागले. (Excise Duty Team Raid On Hotel, Liquors Seized)

वाशीतील साई परिक्रमा लॉजवर छापा
इम्तियाज जलीलांचे मुख्यमंत्र्यांना पत्र; बाजारपेठा, व्यवसाय सुरु करण्याची मागणी

परवानाधारक मद्यविक्रीची दुकाने बंद असतानाही तालुक्यातील प्रत्येक गावात तसेच रस्त्यावरील जेवणावळीच्या हॉटेलमधून सर्रासपणे बेकायदेशीररित्या मद्यविक्रीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले. अर्थपूर्ण व्यवहारामुळे पोलिस प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत असल्याची ओरड निर्माण झाली आहे. तालुक्यातील बहुतांश गावात देशी-विदेशी मद्याची बेकायदेशीर विक्री होत आहे. त्यामुळे शासनाला लाखो रुपयाच्या महसूलवर पाणी सोडावे लागत असल्याची स्थिती निर्माण झाली आहे. त्यातच शुक्रवारी मोहा येथील सुरजकुमार शामकांत झोरी यांच्या मालकीच्या हॉटेल  वाडा येथे देशी-विदेशी मद्यसाठा असल्याची माहिती उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाला मिळाली. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त कांतीलाल उमाप यांच्या आदेशानुसार उत्पादन शुल्क विभागाचे संचालक उषा वर्मा, उपायुक्त पी.एच.पवार, उस्मानाबादचे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक विजय चिंचाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली छाप मारण्यात आला. देशी-विदेशी मद्याच्या १ हजार ८ बाटल्या किंमत १ लाख १० हजार ८०० रुपयांचे मद्य जप्त करण्यात आले. ही कारवाई भरारी पथकाचे निरीक्षक एम.ए.शेख, एस.पी. काळे, आर.आर.गिरी, एम.पी कंकाळ, व्ही.आय.चव्हाण यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.