Sambhaji Nagar News : विभागीय चौकशीला वेग

आजवर ९८ कोटींच्या रकमांचे जुळले हिशेब
Aurangabad
Aurangabadsakal
Updated on

छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील विविध विभागांमध्ये खरेदी प्रकरणात १२७ कोटी रुपयांची अनियमितता झाल्याचा आरोप झाला होता. याप्रकरणात उच्च न्यायालय खंडपीठात जनहित याचिका दाखल आहे. दरम्यान, तत्कालीन सहसंचालक डॉ. राजेंद्र धामणस्कर यांच्या चौकशी समितीने १९९६ ते २०१९ दरम्यान अनियमितता झाल्याचा ठपका ठेवला होता, याच प्रकरणात विद्यापीठ प्रशासनानेही स्वतःहून गांभीर्याने घेत अद्याप ९८ कोटींवर रुपयांचे हिशेब जुळविले आहेत. दरम्यान या प्रकरणातील संबंधित ४३ जणांची निवृत्त न्यायाधीश श्रीधर कुलकर्णी यांच्यामार्फत चार डिसेंबरपासून विभागीय चौकशी सुरु असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

काय आहे प्रकरण?

१९९६ ते २०१९ दरम्यान विद्यापीठात मोठ्या प्रमाणात आर्थिक अनियमितता झाल्याचा आरोप लोकप्रतिनिधींनी विधिमंडळात केला होता. याप्रकरणात शासनाने तत्कालीन सहसंचालक (उच्च शिक्षण) शासनाने धामणस्कर यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमत अहवाल मागविला होता. धामणस्कर समितीने विद्यापीठाचे २३ वर्षातील अभिलेखे तपासले. तपासाअंती संबंधित विभागप्रमुखांनी संलग्नीकरण शुल्क नोंद वहीमध्ये १७.९६ कोटीच्या नोंदी नसणे, विनानिविदा २६.५२ कोटींची खरेदी, सदोष खरेदी प्रक्रियेद्वारे उच्चदराने विद्यापीठाचे ६.८६ कोटींचे नुकसान करणे, सदोष प्रदानाद्वारे ४.६७ कोटींचा निधी अतिरिक्त प्रदान करणे आदी अनेक गंभीर निरीक्षणे नोंदविण्यात आली होती.

Aurangabad
Sambhaji Nagar News : बॉयफ्रेंड भोवला ११ लाखाला!

दरम्यान, कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी प्रकुलगुरू डॉ. श्याम शिरसाठ यांच्या अध्यक्षतेत अभ्यास गटाची तर राज्यशासनाच्या उच्च शिक्षण विभागाने ऑडिटर ठोंबरे समिती स्थापन केली होती. चौकशी समितीच्या अहवालानंतर संबंधितांची विभागीय चौकशीसाठी परभणी कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. अशोक ढवण यांची समिती नेमली. मात्र, डॉ. ढवण यांनी विभागीय चौकशीसाठी असमर्थता दर्शविल्यानंतर आता निवृत्त न्यायाधीश श्रीधर कुलकर्णी यांची एकसदस्यीय समिती नेमली. ही समिती मागील ४ डिसेंबरपासून ४३ जणांची चौकशी करीत आहे, अशी माहिती विद्यापीठ सुत्रांनी दिली.

अनेकजण मृत तर कोणी वयोवृद्ध

विभागीय चौकशी लावण्यात आलेल्या ४३ जणांपैकी बहुतांश निवृत्त झाले आहेत, तर काही जण मृत झाले आहेत. विशेष म्हणजे, चौकशी सुरु असलेल्यांमध्ये काहीजण अद्याप विभागप्रमुख, तसेच विद्यापीठात विविध पदांवर कार्यरत आहेत. तर काहीजणांची पदोन्नती होऊन उच्चपदावर विराजमान होऊन निवृत्त झाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.