Sambhaji Nagar : रसिकांनी अनुभवला ‘कथ्थक’चा आविष्कार ; वेरूळ अजिंठा आंतरराष्ट्रीय महोत्सवाच्या ‘पूर्वरंग’चे थाटात उद्‍घाटन

‘कथा कहे सो कथ्थक कहावे’ म्हणजे जो कथा सांगतो तो कथ्थक. कथ्थक नृत्यातून शास्त्र, मुद्राभिनय, अजिंठा-वेरूळच्या शिल्पांची अनुभूती देणारा उत्कट आविष्कार प्रसिद्ध कथ्थक नृत्यांगना निधी प्रभू यांनी शनिवारी सादर केला.
sambhaji nagar
sambhaji nagar sakal
Updated on

छत्रपती संभाजीनगर : ‘कथा कहे सो कथ्थक कहावे’ म्हणजे जो कथा सांगतो तो कथ्थक. कथ्थक नृत्यातून शास्त्र, मुद्राभिनय, अजिंठा-वेरूळच्या शिल्पांची अनुभूती देणारा उत्कट आविष्कार प्रसिद्ध कथ्थक नृत्यांगना निधी प्रभू यांनी शनिवारी सादर केला. उत्कृष्ट पदन्यास व मुद्राभिनयाने निधी यांनी रसिकांपुढे कथ्थक नृत्याची परंपरा सहजगत्या दाखवली.

महाराष्ट्र शासन, जिल्हाधिकारी कार्यालय, महानगरपालिका, महाराष्ट्र पर्यटन विभाग, वेरूळ अजिंठा आंतरराष्ट्रीय महोत्सव समिती आणि स्मिता हॉलिडेजतर्फे आयोजित वेरूळ अजिंठा आंतरराष्ट्रीय महोत्सवाच्या ‘पूर्वरंग’ कार्यक्रमास सुरवात झाली. संत एकनाथ रंगमंदिर येथे उद्‍घाटनप्रसंगी मंत्री अतुल सावे, लोकसेवा आयुक्त व महोत्सवाचे मुख्य सल्लागार दिलीप शिंदे, मनपा प्रशासक जी. श्रीकांत, पर्यटन उपसंचालक विजय जाधव, महोत्सव समन्वयक अनिल इरावणे, सारंग टाकळकर, स्मिता हॉलिडेचे जयंत गोरे, किरण देशपांडे यांची प्रमुख उपस्थिती होती. डिजिटल माध्यमांत आणि प्रत्यक्ष सांस्कृतिक कार्यक्रम ऐकणे ही बाब वेगळी आहे. प्रत्यक्ष कार्यक्रम ऐकताना घुंगराचा आवाज तुमच्या ह्रदयापर्यंत पोचेल, अशा भावना जी. श्रीकांत यांनी व्यक्त केल्या. तर या महोत्सवाची परंपरा कायम रहायला हवी, असे अतुल सावे म्हणाले.

sambhaji nagar
Sambhaji Nagar News : दुष्काळाची आणि अतिवृष्टीची मदत अद्याप नाहीच ; दुष्काळ जाहीर करून दोन; तर पाहणी करून महिना लोटला

विविध कलांनी प्रेक्षक मंत्रमुग्ध

कार्यक्रमाची सुरवात निधी प्रभू व सहकारी यांनी केली. त्यांनी'' अनुभूती'' या संकल्पनेवर नृत्य सादर केले. यानंतर मराठवाड्यातील शाहीर रामानंद उगले (जालना) यांनी महाराष्ट्राचे लोकगीत सादर केली. प्रा. डॉ. गणेश चंदनशिवे यांच्या लोकोत्सव कार्यक्रम सादर केला. त्यांना ढोलकीवर पांडुरंग घोटकर (गंगापूर) यांनी साथ दिली. रेश्मा परितेकर यांची लावणी सादर झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नीता पानसरे यांनी केले.

मराठवाड्यात महोत्सवाचा जागर

वेरूळ अजिंठा आंतरराष्ट्रीय महोत्सवाचा जागर करण्यासाठी यावर्षी प्रथमच संपूर्ण मराठवाड्यातील जिल्ह्यात महोत्सवाची ज्योत नेण्यात आली. प्रत्येक जिल्ह्यातील प्रशासकीय अधिकारी यांना महोत्सवाचे निमंत्रण देण्यात आले.

आज पूर्वरंगमध्ये

पूर्वरंग कार्यक्रमात रविवारी संत एकनाथ रंगमंदिर येथे सायंकाळी ६.४५ वाजता तबलावादक सई बारबोटे, सतार वादक डॉ. स्वीकार कट्टी कला सादर करतील. त्यानंतर संगीतकार जोडगोळी ‘अविनाश विश्वजीत लाइइव्ह कॉन्सर्ट’ होईल. रोहित राऊत, मधुरा कुंभार, रवींद्र खोमणे हे गायन करतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.