औरंगाबाद : सतत तीन वर्ष एकही कर्जाचा हप्ता न चुकवता कर्ज फेडणाऱ्या सभासदांना २० टक्के वाढीव पीककर्ज (Crop Loan) देण्यात येणार असल्याचे जिल्हा बॅंकेचे (Aurangabad District Cooperative Bank) अध्यक्ष नितीन पाटील (Nitin Patil) यांनी सांगितले. मंगळवारी (ता.दहा) पत्रकार परिषदेत जिल्हा बॅंकेच्या आर्थिक वर्षांची माहिती नितीन पाटील दिली. यावेळी ते म्हणाले की, बॅंकेच्या वतीने जिल्ह्यातील शेतकरी (Farmer) सभासदांना अल्पमुदत पीक कर्ज वाटप करण्यात येत आहे. यात २०२१-२२ खरीप हंगामात ४१९.७२ कोटीचे पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट्य असून आतापर्यत ३२३.७२ कोटीचे पीक कर्ज वाटप करण्यात आले आहे. तर २०२०-२१ला ५२४ कोटी रुपयाचे पीक कर्ज वाटप करण्यात आले आहे.
दरम्यान गेल्या वर्षीचे कर्ज वाटपाची ७० टक्के वसुली झाली असून नियमीत कर्ज फेडणाऱ्या सभासदांना मिळणार २० टक्के वाढीव पीक कर्ज देण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेला असल्याचे नितीन पाटील यांनी सांगितले. तसेच नानाची देशमुख कृषी संजीवनी योजना(पोकरा) अंतर्गत जिल्ह्यातील २४ सभासदांना ५.१५ कोटीचे कर्ज देण्या आले असून १७ सभासदांना २.१२ कोटीचे अनुदान प्राप्त झाले असल्याचे पाटील यांनी सांगितले. यावेळी अर्जुन गाढ़े, जावेद पटेल, अभिषेक जैस्वाल, दिनेश परदेशी, आर. आर. शिंदे,अजय मोटे उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.