बनावट लसीकरण प्रमाणपत्र देणाऱ्या चौघांच्या पोलिस कोठडीत वाढ

आरोपींनी शंभरावर बनवाट प्रमाणपत्र वाटल्याची माहिती
Fake Vaccination Certificate four givers in police custody
Fake Vaccination Certificate four givers in police custodysakal
Updated on

औरंगाबाद : करोनाची लस (Corona vaccine) घेतलेली न घेता ६०० ते एक हजार रुपये घेवून लसीचे प्रमाणत्र (Vaccination Certificate) देणाऱ्या दोन एमबीबीएस डॉक्‍टर भावंडांसह दोन क्ष-किरण तज्ज्ञ अशा चौघांच्या पोलिस कोठडीत २० डिसेंबर पर्यंत वाढ करण्‍याचे आदेश प्रथम वर्ग न्‍यायदंडाधिकारी बी. डी. तारे यांनी शनिवारी (ता. १८) दिले.

Fake Vaccination Certificate four givers in police custody
नांदेड : अर्धापूर नगरपंचायतीचा प्रचार शिगेला

डॉ. शेख रझिउद्दीन फहीमउद्दीन शेख रहीम (वय २७, दिलसर कॉलनी, आमखान मैदानाजवळ), डॉ. शेख मोहियोद्दीन ऊर्फ अदनान शेख फहीम (वय ३६, रा. मनुर ता. वैजापुर ह. मु. दिलरस कॉलनी), क्ष-किरण तज्ज्ञ मोहम्मद मुदस्सीर मोहम्मद अशफाक (वय २१, रा. गल्ली नं. ३ गणेश कॉलनी) व अबुबकर अल हमीद हादी अल हमीद (२३, रा. रहेमानिया कॉलनी आझाद चौक) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

Fake Vaccination Certificate four givers in police custody
औरंगाबाद जिल्ह्यात दिवसभरात धावल्या २४ शिवशाही, २३ लालपरी

जिन्‍सी पोलिस ठाण्‍याचे उपनिरीक्षक अनंता तांगडे यांनी फिर्याद दिली होती. त्‍यानुसार व्‍हीआयपी फंक्शन हॉल नजिक पोलिसांनी कारवाई करुन आरोपींना अटक केली होती. आरोपींनी शंभरावर बनवाट प्रमाणपत्र वाटल्याची माहिती तपासात समोर आली. प्रकरणात जिन्‍सी पोलीस ठाण्‍यात गुन्‍हा दाखल करण्‍यात आला; तसेच आरोपींचे साथीदार अद्यापही पसार आहेत. आरोपींच्‍या कोठडीची मुदत संपल्याने त्‍यांना न्‍यायालयात हजर करण्‍यात आले होते. न्यायालयात सहायक सरकारी वकील निता किर्तीकर यांनी युक्तीवाद केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()