औरंगाबाद ः कोरोनाबाधित रुग्णांची संख्या शहरात झपाट्याने वाढत आहे. पदमपुरा भागात नव्याने साथ पसरली असून, एकाच कुटुंबातील तब्बल २० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने धक्का बसला आहे. विशेष म्हणजे या कुटुंबातील नागरिकांनी सुरवातीस स्वॅब देण्यास विरोध केला. पोलिसांना पाचारण करून स्वॅब घेतले असता, तब्बल २० जणांना कोरोना झाल्याचे समोर आल्याने धक्का बसला.
पदमपुरा भागात दोन महिन्यांपूर्वी एका डॉक्टरला कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर दोन-चार रुग्ण आढळले. काही दिवसांपूर्वी या भागातील कोरोनाची साखळी तुटली होती. मात्र, चार दिवसांपूर्वी कमान भागातील एक ८० वर्षीय वृद्ध महिला कोरोनाबाधित आढळून आली. त्यानंतर त्यांच्या संपर्कातील चार जणांचे स्वॅब घेण्यात आले. या चारही जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. मोठ्या वाड्यात राहणाऱ्यांच्या संपर्कातील इतरांचे स्वॅब घेण्यासाठी महापालिकेचे पथक पोचताच सदस्यांनी मात्र विरोध केला. शेवटी पोलिसांना पाचारण करून स्वॅब घेण्यात आला असता, तब्बल १५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले.
कोरोना काळामध्ये सर्वच देशांनी आता शस्त्रसंधीचे पालन करावे
गल्लीतील डॉक्टरने केले उपचार
या कुटुंबातील अनेकांना सर्दी, खोकल्याचा त्रास होता. त्यांनी गल्लीतील डॉक्टरकडून उपचार घेतले. मात्र वृद्ध महिलेला त्रास सुरू झाल्यानंतर तिला कोरोना झाल्याचे समोर आले व घरातील तब्बल २० जण नंतर पॉझिटिव्ह निघाले. महापालिकेच्या पथकाने सोमवारी याच वाड्यात राहणाऱ्या इतर कुटुंबांतील व परिसरातील ४० जणांचे स्वॅब घेतले आहेत. याच भागातील आणखी एका कुटुंबातील तिघे पॉझिटिव्ह आढळले आहेत.
-
शहरात ७९४ जण क्वारंटाईन
कोरोना विषाणूचा संसर्ग थांबविण्यासाठी महापालिकेने संस्थात्मक (इन्स्टिट्युशनल) क्वॉरंटाइन करण्यावर भर दिला आहे. सध्या तब्बल ७९४ नागरिकांना क्वॉरंटाइन करण्यात आले आहे. संत तुकाराम हॉस्टेलमध्ये ४२, कलाग्रामध्ये २८, एमसीइडी हॉस्टेलमध्ये ३९, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात ५५, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील सीएसएममध्ये ७९, रमाई वसतीगृहात ४०, अतिथीगृहात ११, यशवंत हॉस्टेलमध्ये ६३, शहीद भगतसिंग हॉस्टेलमध्ये तीन तर महर्षी शिंदे हॉस्टेलमध्ये २० जणांना क्वॉरंटाइन केले आहे. नवखंडा वसतीगृहात ५२, महसूल प्रबोधिनीत ५, एसआरपीएफ सेंटरमध्ये १०५, जामा मशिदीत १४, देवगिरी गर्ल्स हॉस्टेलमध्ये ३६, शासकीय बीएड. कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये ३४, विभागीय क्रिडा संकुलातील तीन इमारतींपैकी मुलांच्या वसतीगृहात येथे ९७, मुलीच्या वसतीगृहात ३८ तर हॉलमध्ये १२ जणांना क्वॉरंटाइन केले आहे. २३ क्वॉरंटाइन सेंटर सध्या सुरू आहेत.
कोरोना विषाणूच्या साथीबाबत सर्वप्रथम सावधानतेचा इशारा चीनने नव्हे तर...
१४ जणांचा हॉटेलमध्ये मुक्काम
आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्यांसाठी शहरातील चार हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. यापैकी हॉटेल मेनॉर येथे चार तर जिमखाना हॉटेलात १२ असे १४ जण स्वखर्चातून क्वॉरंटाइन झाले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.