लासूर स्टेशन (जि.औरंगाबाद) : लासूर स्टेशन (ता.गंगापूर) (Gangapur) येथील सावंगी चौकात गुरुवारी (ता.२६) सकाळी दहाच्या सुमारास शेतकऱ्यांनी टोमॅटो फेकून आंदोलन केले. टोमॅटोचे भाव गडगडल्याने शेतकरी आक्रमक झाल्याचा यावेळी पाहायला मिळाला. नागपूर (Nagpur) - मुंबई (Mumbai) महामार्गावर सावंगी चौकात येथे तब्बल एक तासभर चाललेल्या या आंदोलनादरम्यान वाहतूक बंद झाली होती. टोमॅटोला (Tomato Producing Farmer) प्रति कॅरेट पाचशे रुपये हमीभाव जाहीर करावा, अतिवृष्टी नुकसान झालेल्या टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना ५० हजार रुपये अनुदान मंजूर करावे, टोमॅटोची निर्यातबंदी उठवावी, लासूर स्टेशन येथे टोमॅटो प्रक्रिया उद्योग सुरू करावा, टोमॅटो खरीददार (Agriculture) व्यापाऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत करावी, आदी मागण्यांचे निवेदन शिल्लेगाव पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रविंद्र खांडेकर यांना देण्यात आले. औरंगाबाद जिल्ह्यातील बाजारात स्थानिक टोमॅटोची मोठी आवक होत आहे.
टोमॅटोच्या वीस किलोच्या क्रेट्सला पन्नास ते शंभर रुपयांपर्यंत म्हणजे तीन-चार रुपये किलो इतका बाजार भाव मिळतोय. या कमी दरामुळे शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला. वाहतूक, मार्केटमधील चढ-उतार, शेतातून तोडणीचा खर्चही निघत नसल्याने संतापलेल्या शेतकऱ्यांनी टोमॅटो रस्त्यावर फेकत सरकारचा निषेध केला. एकरी ऐंशी हजारहून अधिक खर्च टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना येतो. टोमॅटोला कमी भाव मिळाल्यामुळे शेतकरी अडचणीत सापडले. जिल्ह्यातील टोमॅटो उत्पादक शेतकरी योग्य दर न मिळाल्यामुळे टोमॅटो रस्त्यावर फेकून देत आहेत. माजी बांधकाम सभापती संतोष जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली या आंदोलनात धामोरीचे उपसरपंच रविंद्र चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य नारायण वाकळे, मनसेचे अण्णासाहेब जाधव, अमोल जाधव, संजय पांडव, नजीर पटेल, अभिजीत माळोदे, संजय चव्हाण, विलास इंगळे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.