पिकास पाणी देण्याची धडपड सुरु असताना शेतकऱ्याचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

वडील बेशुध्द अवस्थेत पडलेले दिसताच त्याने...
Farmer And Aurangabad News
Farmer And Aurangabad Newsesakal
Updated on

लोहगाव (जि.औरंगाबाद ) : लोहगाव परिसरातील अमरापूरवाघुडी (ता.पैठण) येथील शेतकरी औरंगपूर बुट्टेवाडी शिवारात बटाईने केलेल्या शेतात कांदा पीकास पाणी भरण्यासाठी गेला असता विद्युतपंप सुरू करताना विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (ता.२१) दुपारी साडेबारा वाजता घडली. भागचंद भाऊराव शिदे (वय ५२) असे मृताचे नाव आहे. या बाबत मिळालेली माहिती अशी, की अमरापूरवाघुडी येथील धरणग्रस्त शेतकरी भागचंद शिंदे हे सोमवारी औरंगपूर बुट्टेवाडी शिवारात बटाईने केलेल्या गट नंबर- १ क्षेत्रातील उन्हाळी कांदा (Onion) पीकास पाणी भरण्यासाठी साडेबारा वाजेदरम्यान गेले असता विद्युतपंपाचे स्टार्टर सुरू करताना विजेचा धक्का बसुन कोसळले. (Farmer Died Due To Electric Shock In Paithan Taluka Of Aurangabad)

Farmer And Aurangabad News
सत्तेसाठी गहाण टाकलात तुम्ही स्वाभिमान, चंद्रकांत पाटलांचा उद्धव ठाकरेंवर टीका

दरम्यान त्यांच्या मुलगा दादासाहेब शिंदे हा शेतात गेला असता वडील बेशुध्द अवस्थेत पडलेले दिसले. त्याने चुलतभाऊ नवनाथ शिंदे, पाडुरंग शिंदे, बद्रीनाथ शिंदे, कृष्णा टेमक यांना भ्रमनध्वणीद्वारे बोलावून तात्काळ बिडकीन ग्रामीण रूग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. लोहगाव बीट जमादार सोमनाथ तांगडे यांच्या खबरीवरुन पैठण औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्याचे जमादार राजेश चव्हाण, कर्तारसिंग सिंघल यांनी पंचनामा केल्यावर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी (Aurangabad) शवविच्छेदन केले.

Farmer And Aurangabad News
श्रीलंका संकटात ! नागरिकांना मिळेना पेट्रोल, कागद नसल्याने परीक्षा रद्द

या घटनेची पैठण (Paithan) औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्युचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक भागवत नागरगोजे यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार चव्हाण, सिंघल करित आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.