कन्नड: कृषिपंपाचे मागील बिल भरू नका, यापुढच्या बिलाचाही प्रश्न नाही, असा दिलासा राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी शेतकऱ्यांना दिला.
तालुक्यातील मेहगाव येथील भगवानबाबा गडावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी आमदार नितीन पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त रविवारी (ता. २२) आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते.
कृषिमंत्री मुंडे पुढे म्हणाले, शासनाने अनेक लोकहिताच्या योजना कार्यान्वित केल्या, लाडकी बहीण योजनेमुळे महिला महिनाभरापासून रक्षाबंधन साजरा करत आहेत. तर, राज्य सरकारची 'नमो', तर केंद्राच्या पीएम किसान योजनेंतर्गत शेतकऱ्यांना बारा हजार रुपये देण्यात येत आहेत. कन्नड तालुक्याकरिता एमआयडीसीसाठीही मदत करण्यात येईल. तसेच, वासडी भागातील काही गावांचा पोखरा योजनेत समावेश करण्यात येईल, असे अश्वासन दिले.
माजी आमदार नितीन पाटील यावेळी भाषणादरम्यान म्हणाले, की अजित पवार यांना मुख्यमंत्री करण्यासाठी कन्नड विधानसभा मतदारसंघातून आमदार दिल्याशिवाय राहणार नाही. कन्नड तालुक्यात मोठ्या संख्येने बेरोजगार युवक आहेत. रोजगार नसल्याने तरुण अविवाहित आहेत. कन्नडला एमआयडीसीची गरज आहे. विधानसभेत मलाच उमेदवारी मिळणार असून माजी नगराध्यक्ष संतोष कोल्हे व माझी कायम सेटिंग असते. त्यामुळे विरोधकांनी चिंता करू नये, असा टोलाही त्यांनी लगावला.
मेहगाव भगवानगडाच्या विकासासाठी यथोचित मदत करण्यात येईल. पुढच्या वेळेस पंकजाताई मुंडे यांनाही घेऊन येईन, असे आश्वासनही कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.