Cotton : एक जूनपूर्वी शेतकऱ्यांनी कापूस लागवड करू नये; बोंडअळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कृषी विभागाचे आवाहन

घाऊक आणि किरकोळ बियाणे विक्रेत्यांनी एक जूनपूर्वी कापूस बियाणे विक्री केल्यास विक्रेत्यांवर सक्त कारवाई करण्याचा इशारा
farmers should not plant cotton before june 1 2023 agriculture department appeals
farmers should not plant cotton before june 1 2023 agriculture department appeals sakal
Updated on

छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यात बोंड अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कृषी विभागाने मोहीम हाती घेतली आहे. एक जूनपूर्वी शेतकऱ्यांनी कापूस लागवड करू नये, असे आवाहन जिल्हा कृषी विभागाने केले आहे. घाऊक आणि किरकोळ बियाणे विक्रेत्यांनी एक जूनपूर्वी कापूस बियाणे विक्री केल्यास विक्रेत्यांवर सक्त कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

सध्या जिल्ह्यात खरीप हंगामाला सुरवात झाली असून शेतकरी खरीप हंगामाची तयारीत व्यस्त आहे. अशात कृषी विभागातर्फे एक जूनपूर्वी शेतकऱ्यांना कापूस लागवड करू नये, असे आदेश काढण्यात आले आहे. दरम्यान २०१७-१८ला राज्यात मोठ्या प्रमाणात बोंड अळीचा प्रादुर्भाव झाला होता. यामुळे राज्य शासनाला ५०० कोटी रुपयांची मदत शेतकऱ्यांना वाटप करावी लागली.

farmers should not plant cotton before june 1 2023 agriculture department appeals
Cotton Rate Crisis : कापूस उत्पादक संकटांच्या चक्रव्यूहात; सरकार फिरतेय खुर्चीभोवती गोल...

यासाठी बोंड अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यातील कृषी विद्यापीठाच्या वतीने एक सर्वेक्षण करण्यात आले असून या सर्वेक्षणाच्या निष्कर्षाप्रमाणे पूर्व कापूस हंगामी लागवड केल्यास बोंड अळीचा प्रादुर्भाव वाढतो, त्यामुळे पूर्व हंगामी कापूस लागवड टाळणे योग्य असल्याचा निष्कर्ष कृषी विद्यापीठाने ठेवला आहे. म्हणून बोंडअळीचे जीवनचक्र खंडित करण्याचे नियोजन कृषी विभागातर्फे करण्यात आले आहे.

farmers should not plant cotton before june 1 2023 agriculture department appeals
Chhtrapati Sambhaji Nagar : तोपर्यंत औरंगाबादच्या नावात बदल नको; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

दमदार पाऊस झाल्यानंतरच लागवड करा

साधारणतः २० मेपासून मान्सूनपूर्व हंगामी कापसाची लागवड केली जाते. त्यासाठी शेतकऱ्यांनी आता आपल्या शेतजमिनीची नांगरणी, वखरणी करण्यास सुरवात केली आहे. जिल्ह्यात सहा लाख हेक्टर खरिपाचे क्षेत्र असून यात सर्वाधिक चार लाख हेक्टर हे कपाशीचे लागवड करण्यात येते.

farmers should not plant cotton before june 1 2023 agriculture department appeals
Crime News : शेतकऱ्यांच्या वेषात गेले अन् फरारीला घेऊन आले!

जवळपास ६० टक्के एवढे कापसाचे प्रमाण असल्याने शेतकऱ्यांनी कपाशी लागवडीची घाई न करता दमदार पाऊस झाल्यानंतरच कापसाची लागवड करावी असे आवाहन कृषी विभागातर्फे करण्यात आले आहे.

सध्या बाजारात कपाशी बियाण्याची उपलब्धता आहे, मात्र बोंड अळीच्या नुकसानीपासून वाचण्यासाठी शेतकऱ्यांनी एक जूनच्या अगोदर कपाशीची लागवड करू नये.

- पी.आर. देशमुख, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.