जवळपास पाच महिन्यांपूर्वी एस.जे.शुगर रावळगाव (ता.मालेगाव, जि.नाशिक) या कारखान्याने लोहगाव, आपेगाव शिवारातील गाळप केलेल्या ऊसाचे बिले खात्यात जमा न केल्याने ऐन खरीपाच्या तोडावर शेतकरी आर्थिक अडचणीत सापडून हवालदिल झाले होते.
लोहगाव (जि.औरंगाबाद) : एस.जे.शुगर रावळगाव कारखान्यास S.J.Sugar Rawalgaon Mill गाळपास दिलेल्या ऊसाच्या बिलाअभावी हवालदिल झालेल्या पैठण Paithan तालुक्यातील लोहगाव, आपेगाव येथील शेतकऱ्यांनी ऊसाच्या पैशासाठी आत्महत्येचा इशाऱ्याची 'सकाळ'च्या वृत्ताची दखल कारखाना व्यवस्थापनाने घेतली आहे. गुरूवारी (ता.एक) दुपारी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पन्नास टक्के Aurangabad रक्कम जमा करण्यास सुरूवात केली आहे.जवळपास पाच महिन्यांपूर्वी एस.जे.शुगर रावळगाव (ता.मालेगाव, जि.नाशिक) या कारखान्याने लोहगाव, आपेगाव शिवारातील गाळप केलेल्या ऊसाचे बिले FRP Price खात्यात जमा न केल्याने ऐन खरीपाच्या तोडावर शेतकरी आर्थिक अडचणीत सापडून हवालदिल झाले होते. कारखान्याने दहा दिवसांत पैसे जमा न केल्यास सामुहिक आत्महत्या करण्याचा इशारा अन्नदाता शेतकरी संघटनेचे अध्यक्ष जयाजी सुर्यवंशी, पवन औटे, राजु रूपेकर, वसंत जगताप यांच्यासह शेतकऱ्यांनी प्रशासनाला निवेदनाद्वारे दिला होता. याबाबतचे वृत्त सकाळमध्ये गुरूवारी शेतकरी दिनी प्रसिद्ध होताच कारखाना व्यवस्थापनाने या बातमीची दखल घेत दुपारपासुन शेतकऱ्यांच्या खात्यात पन्नास टक्के एक हजार रूपये टनाप्रमाणे रक्कम जमा करण्यास सुरुवात केल्याचे एसएमएस मोबाईलवर आल्याचे शेतकऱ्यांनी Farmer सकाळच्या बातमीदारास कळविले आहे.farmers victory, sugar cane payment credited in their bank account paithan aurangabad
'सकाळ'ने आमच्या व्यथेची बातमी प्रसिद्ध केल्यामुळे आम्हाला पन्नास टक्के का होईना बिले जमा झाली. त्याबद्दल आभार व्यक्त करून बाकी राहिलेल्या बिले दहा दिवसांत जमा न झाल्यास आम्ही कारखाना परिसरात आदोलन करू असेही यावेळी जयाजी सुर्यवंशी, पवन औटे, राजु रूपेकर, वसंत जगताप आदींनी सांगितले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.