केंद्रीय मंत्री दानवे,कराडांवर गुन्हे दाखल करा : हर्षवर्धन जाधव

माजी आमदार हर्षवर्धन जाधव
माजी आमदार हर्षवर्धन जाधवसकाळ
Updated on

कन्नड (जि.औरंगाबाद) : कन्नड (Kannad) येथील जनआशीर्वाद यात्रा (Jan Ashirwad Yatra)` रात्री सुरू होऊन उशिरा १२ वाजता समारोप होत असताना पोलिस यंत्रणा त्या कार्यक्रमास संरक्षण देतात. केंद्रीय राज्यमंत्री असल्याने त्यांना वेगळा न्याय आणि इतरांना वेगळा न्याय असेल का, असा सवाल उपस्थित करून पोलिसांनीच कार्यक्रमाच्या आयोजकांवरच नव्हे तर केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड (Union Minister Of State For Finance Bhagwat Karad) व केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Union Minister Of State For Railway Raosaheb Danve) या मंत्र्यांवर गुन्हे दाखल करावे, अशी मागणी माजी आमदार हर्षवर्धन जाधव (Ex MLA Harshvardhan Jadhav) यांनी केली आहे. कन्नड येथील शासकीय विश्रामगृह येथे रविवारी (ता.२२) आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. श्री.जाधव म्हणाले की, नियमाचा भंग करणारे कुणीही असो नियम भंग केला की त्यांच्यावर गुन्हे दाखल केले पाहिजे. कोविड १९ च्या अनुषंगाने रात्री दहा नंतर हॉटेल व्यावसायिक इतर दुकानदार यांच्यावर गुन्हे दाखल करतात. लग्नसमारंभ आणि अंत्यविधीसाठी काटेकोर नियमांचे पालन करण्यास सांगतात जर कुणी नियमाचा भंग केला तर त्यावर गुन्हे दाखल करतात. कन्नड येथील जनआशीर्वाद यात्राच रात्री १० वाजता सुरू झाली आणि उशिरा १२ वाजेपर्यंत चालली. नियम पायमल्ली तुडवणाऱ्यावर गुन्हे का दाखल केले नाही.

माजी आमदार हर्षवर्धन जाधव
जन आशीर्वाद यात्रेप्रकरणी भाजप पदाधिकाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल

संविधानाचे नियम फक्त सर्वसामान्यांना आहेत का मंत्र्यांना नाही का, असा सवाल यावेळी त्यांनी उपस्थित करून पोलिसच उशिरा सुरू झालेल्या नियमबाह्य कार्यक्रमास संरक्षण देणार असेल तर हे पोलिसांच्या देखील अंगलट येऊ शकते. पत्रकार परिषदेत श्री.जाधव म्हणाले की, कन्नड तालुका समर्थ असून कुणी दत्तक घेण्याची गरज नाही. तसेच केंद्रीय मंत्री यांनी तालुक्याला काही ठोस मदत देण्याऐवजी नागरिकांचा आणि त्यांच्या भावनेचा तसेच नागरिकांचा अवमान केला असून खुद्द रेल्वेमंत्री, रेल्वे होणार नाही असे म्हणत आहेत. त्यात भरीस भर म्हणून टोल देखील माफ करणार नाही, असे म्हणत असेल तर आशा मंत्र्यांकडून काय अपेक्षा ठेवाव्यात असाही सवालही त्यांनी उपस्थित केला. श्रावणमासात मंदिरात केंद्रीय मंत्री राजकीय कार्यक्रम घेतात. मात्र, तेथील देवाचे दर्शन घेत नाही. ही खेदजनक बाब असल्याचेही ते म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()