Fire NOC - शहरात २४ मीटरपर्यंत उंचीची इमारत बांधताना ‘फायर एनओसी’ची गरज नाही. यासंदर्भात अर्किटेक्ट, बिल्डरांसाठी एकत्रीकृत विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावलीतच नियम आहेत, त्यानुसार जबाबदारी पार पाडण्यात यावी, असा निर्णय महापालिकेचे प्रशासक जी. श्रीकांत यांनी सोमवारी (ता. १९) झालेल्या बैठकीत घेतला.
प्रशासक जी. श्रीकांत यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी बांधकाम व्यावसायिकांची संघटना क्रेडाई व आर्किटेक्ट अँड बिल्डर असोसिएशनच्या प्रतिनिधींची बैठक स्मार्ट सिटी कार्यालयात घेण्यात आली.यावेळी क्रेडाई आर्किटेक्ट अँड बिल्डर असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी फायर एनओसीचा मुद्दा उपस्थित केला.
त्यांनी सांगितले की, महापालिका हद्दीतील १५ मीटर उंचीपर्यंतची इमारत बांधताना फायर एनओसी घ्यावी लागते. एकत्रिकृत विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली नुसार २४ मीटर पर्यंत उंचीची इमारत बांधताना फायर एनओसी ची गरज नाही. त्यावर प्रशासकांनी अग्निशमन नियमावलीमध्ये काय तरतूद आहे आणि आर्किटेक्ट व बिल्डर यांची काय काय जबाबदारी आहे याची माहिती घेतली.
ही जबाबदारी आर्किटेक्ट आणि बिल्डर यांची असेल तर त्यांनी युडीसीपीआर नियमावली नुसार काम करावे. अग्निशमन विभागाने त्यांचे आवश्यक ते शुल्क नियमानुसार आकारून ना हरकत बाबत आग्रह धरू नये असे, असे प्रशासकांनी आदेश दिले.
मोठ्या गृह प्रकल्पासाठी ऑनलाइन बांधकाम परवानगी घेताना अडचणी निर्माण होतात, असा मुद्दाही उपस्थित झाला. त्यावर नगर रचना विभागाचे उपसंचालक मनोज गर्जे यांनी महापालिका मुख्यालयात बिल्डिंग प्लॅन मॅनेजमेंट सिस्टम फॅसिलेटेशन सेंटर सुरू करण्यात आले आहे, त्याची मदत घेण्याचे आवाहन केले.
क्रेडाई व आर्किटेक्ट ॲण्ड बिल्डर असोसिएशनने असेच सेंटर तयार करावे, जेणेकरून ऑनलाइन परवानगी घेणाऱ्या नागरिकांना फायदा होईल. बैठकीला अतिरिक्त आयुक्त रणजित पाटील, डीपी युनिट प्रमुख रजा खान,
विशेष भूसंपादन अधिकारी वी. भा. दहे, उपअभियंता संजय कोंबडे, मुख्य अग्निशमन अधिकारी शिवाजी झणझण, मनोहर सुरे, क्रेडाईचे अध्यक्ष विकास चौधरी, सचिव श्री. सूर्यवंशी, अर्किटेक्ट अँड बिल्डर असोसिएशनचे दीपक देशपांडे, श्री. भाले, श्री. पाटे उपस्थित होते.
विकास आराखड्यातील रस्त्यांचे करा मार्किंग
बैठकीत बिल्डर व अर्किटेक्ट यांनी विकास योजना नकाशातील रस्त्यांचे महापालिकेने मार्किंग करावे, जेणेकरून रस्त्याच्या जागेवर प्लॉटिंग करून कोणी विकणार नाही. यावर लवकरच कारवाई करण्याचे आश्वासन प्रशासकांनी दिले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.