पोलिसांनी युवा मोर्चाच्या शिवराज नारीयलवाले यांना बेदम मारहाण केली. या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.
जालना : भारतीय जनता युवा मोर्चाचे (Bharatiya Janta Yuva Morcha) सरचिटणीस शिवराज नारीयलवाले यांना केलेल्या बेदम मारहाण प्रकरणी एक पोलिस अधिकारी व चार पोलिस कर्मचाऱ्यांना (Police Violence) शुक्रवारी (ता.२८) पोलिस अधीक्षक विनायक देशमुख (SP Vinayak Deshmukh) यांनी निलंबित केले आहे. जालना शहरातील एका खासगी रुग्णालायात ता.नऊ एप्रिल रोजी उपचारादरम्यान एका तरुणाचा मृत्यू झाला होता (Police Brutally Beaten Youth). त्यानंतर काही तरुणांनी डॉक्टरांनी योग्य उपचार केले नाही म्हणत रुग्णालयात गोंधळ घातला. याबाबत माहिती मिळताच तत्कालीन उपविभागीय पोलिस अधिकारी सुधीर खिरडकर , कदीम जालना पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रशांत महाजन यांच्यासह पोलिस अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.(Five Police Men Suspended For Beating Man Brutally In Jalna)
त्यानंतर पोलिसांनी युवा मोर्चाच्या शिवराज नारीयलवाले यांना बेदम मारहाण केली. या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. दरम्यान या प्रकरणाची पोलिस अधीक्षक विनायक देशमुख यांनी गुरुवारी (ता.२७) चौकशीचे आदेश दिले होते. त्यानंतर शुक्रवारी या प्रकरणी पोलिस उपनिरीक्षक भागवत कदम, पोलिस कर्मचारी सोमनाथ लहामगे, नंदकिशोर ढाकणे, सुमित सोळंके, महेंद्र भारसाकळे यांच्यावर श्री.देशमुख यांनी निलंबनाची कारवाई केली आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.