Chhatrapati Sambhajinagar : खानावळींच्या दरांमध्ये वाढ’; विद्यार्थी, नोकरदाराच्या खिशाला तडका

शहरात मासिक दरांमध्ये काही प्रमाणात वाढ
food mess rate hike inflation student worker hit finance chhatrapati sambhajinagar
food mess rate hike inflation student worker hit finance chhatrapati sambhajinagarSakal
Updated on

छत्रपती संभाजीनगर : वाढत्या महागाईमुळे खानावळचालकांनीही मासिक दरांत काही प्रमाणात वाढ केली आहे. अनेक ठिकाणी दर कायम ठेवले असले, तरी दर वाढण्याच्या निर्णयांमुळे विद्यार्थी, नोकरदार खिशाला दरवाढीचा ‘तडका’ बसला आहे.

शिक्षण, पोलिस भरती तसेच अन्य स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी हजारो विद्यार्थी दरवर्षी बाहेरगावाहून छत्रपती संभाजीनगर शहरात दाखल होतात. यासह रोजगारानिमित्त येणाऱ्या युवकांची संख्याही लक्षणीय आहे.

महाविद्यालये तसेच सरकारी वसतिगृहात संधी न मिळालेले अनेक विद्यार्थी हे खासगी वसतिगृहांमध्ये; तसेच खोल्या भाड्याने घेऊन किंवा कॉट बेसिसवर राहतात. शहरातील टीव्ही सेंटर, सिडको, हडको, बेगमपुरा, बीड बायपास, सातारा परिसर, उस्मानपुऱ्यासह प्रामुख्याने ज्या ठिकाणाहून शैक्षणिक संस्था, क्लासेसला ये-जा करायला जवळ पडेल, अशा ठिकाणी राहण्यास पसंती देतात.

food mess rate hike inflation student worker hit finance chhatrapati sambhajinagar
Patanjali Foods: रामदेव बाबांची जादू कायम...14 नवे प्रोडक्ट लाँच करताच पतंजलीचे शेअर सुसाट

त्यामुळे सिडको, हडको, उस्मानपुरा, औरंगपुरा, रेल्वे स्टेशनसह शहर परिसरात भाजी-पोळी केंद्रे, मेस किंवा घरगुती खानावळींची संख्या काही वर्षात वाढली आहे. शहरातील विविध मेसमध्ये साधारणपणे एका सदस्याकडून दोन हजार ते तीन हजार रुपयांपर्यंत दर आकारला जात असून गेल्या वर्षाच्या तुलनेत मेसच्या दरात किंचित वाढ झाल्याचे चित्र आहे.

शैक्षणिक सत्र सुरू झाल्याने खानावळीत वर्दळ वाढली आहे. अनेक नवीन सदस्य मंथली मेंबर झाल्याचे मेसचालक एकनाथ सोनवणे यांनी सांगितले. ‘खाद्यतेलाचे भाव काहीसे कमी झाले तरी डाळीसह अन्य मालाचे भाव वाढले आहेत.

food mess rate hike inflation student worker hit finance chhatrapati sambhajinagar
Food Safety Tips: उन्हाळ्यात शिजवलेले अन्न लवकर खराब होते? हे टाळण्यासाठी ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा

मात्र, असे असतानाही यंदा मेसच्या दरात फारशी वाढ केली नाही. गेल्या वर्षी मेससाठी प्रतिमहिना २१०० रुपये घेतले जात. सध्यात त्यात केवळ शंभर ते दिडशे रुपयांची वाढ केली आहे. दोन भाज्या, पोळ्या, वरण, भात, लोणचे असा मेन्यू असतो. तर आठवड्यातून एकदा गोड पदार्थ दिला जातो, असे त्यांनी सांगितले.

गेल्या वर्षी सदस्यांकडून महिनाकाठी २१०० रुपये घेत असे तर सध्या २२०० रुपये घेतो, अशी माहिती मेसचालक अविनाश काळे यांनी दिली. जेएनईसी कॉलेजसमोरील एका मेसचालकाचे मंथली मेंबरचे दर कायम ठेवल्याचे नमूद केले. अडीच हजार रुपये महिन्याकाठी सदस्याकडून घेतो, असे त्यांनी सांगितले

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.