Jalgaon : मिनी घाटीत सात विद्यार्थ्यांवर उपचार ; केकत जळगाव येथील शाळेतील विषबाधेचे प्रकरण

पौष्टिक आहार म्हणून दिलेल्या बिस्किटातून अडीचशे विद्यार्थ्यांना शनिवारी (ता.१७) विषबाधा झाल्याचा प्रकार पैठण येथील केकत जळगाव येथे घडला होता.
Jalgaon
Jalgaon sakal
Updated on

छत्रपती संभाजीनगर : पौष्टिक आहार म्हणून दिलेल्या बिस्किटातून अडीचशे विद्यार्थ्यांना शनिवारी (ता.१७) विषबाधा झाल्याचा प्रकार पैठण येथील केकत जळगाव येथे घडला होता. प्रकृती बिघडल्याने सात विद्यार्थ्यांना रविवारी (ता. १८) जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. या सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचा दावा उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी केला.

येथील जिल्हा परिषद शाळेत शनिवारी अर्ध्या दिवसाची शाळा असल्याने विद्यार्थ्यांना खिचडीऐवजी दोन वेगवेगळ्या कंपन्यांची बिस्किटे देण्यात आली. बिस्किटे खाल्ल्यानंतर सुमारे पाऊण तासाने अनेक विद्यार्थ्यांना मळमळ, उलट्या होऊन ताप आला. त्यानंतर या विद्यार्थ्यांना पाचोड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. हळूहळू बाधित विद्यार्थ्यांची संख्या २५६ वर पोचली. प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर त्यांना सुटी देण्यात आली. बिस्किटांचे नमुने घेत तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले. दरम्यान, रविवारी तनवीर मन्सूर शेख (वय ११), सायमा सलीम शेख (वय १२), अफान कलीम शेख (वय नऊ), प्रीती शरद मगर (वय ११), अभिषेक अनिल दराडे (वय १२), प्रियांका गणेश मगर (वय १२), सत्यम रवींद्र सानप (वय १२) या मिनी घाटीत सात विद्यार्थ्यांवर उपचार

सात विद्यार्थ्यांना रविवारी सकाळी दहाच्या सुमारास मिनी घाटीत दाखल करण्यात आले. येथील बालरोगतज्ज्ञांच्या मार्गदर्शनात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

उपचारासाठी येऊन मनस्ताप

उपचारासाठी साडेनऊ वाजता रुग्णालयात आल्यानंतर विद्यार्थ्यांना बालरोग विभागात पाठवण्याचे निश्चित करण्यात आले. परंतु, त्यात लिफ्ट बंद, यामुळे जिन्याचा सहारा घ्यावा लागला. पहिले बालरोग विभागामध्ये (२०८) दाखल करण्यात आले. एक तर प्रकृती अस्वस्थ, उकाड्यात पंखा बंद; त्यामुळे मुले त्रस्त झाली. नंतर त्यांना २२१ नंबर मध्ये दाखल करण्यात आले. येथे नातेवाइकांची गर्दी, त्यात वॉर्ड लहान असल्याने कुपोषित बालकांवर उपचार केला जातो तेथे हलविण्यात आले. या सर्व प्रक्रियेत झालेल्या धावपळीमुळे चांगले उपचार मिळावेत यासाठी आलेल्या मुलांसह पालकांनाही मनस्ताप झाला.

भुमरे यांनी घेतली हजेरी

या ठिकाणी खासदार संदीपान भुमरे संबंधितांची भेट घेण्यासाठी आले. लिफ्ट बंद यासह इन्चार्जही हजर नसल्याने भुमरेंचा पारा चांगलाच चढला. त्यांनी प्रशासनातील अधिकाऱ्यांची चांगलीच हजेरी घेतली. शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण यांनीही याठिकाणी भेट दिली.

तपासणीसाठी रक्ताचे नमुने घेतले

दाखल सात विद्यार्थ्यांपैकी अभिषेक दराडे याला ताप असल्याने तपासणीकरिता त्याच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले. सर्वच विद्यार्थ्यांना उलटी, मळमळ, पोटदुखीचा त्रास असल्याने त्यांना सलाइन, ओआरएसचे पाणी, नारळ पाणी, ज्यूस असा हलका आहार दिला जात असल्याचेही डॉक्टरांनी सांगितले.

सात विद्यार्थी पुन्हा पाचोडच्या रुग्णालयात

दरम्यान, रविवारी (ता.१८) सकाळी मळमळ, उलट्या, ताप व पोटदुखीचा त्रास सुरू होऊन प्रकृती खालावल्याने संस्कार गजानन थोरे, पूनम अंबादास आव्हाड, प्रांजल नवनाथ दराडे, भाग्यश्री मगर, संस्कार कैलास थोरे, वैष्णवी परमेश्वर बढे, भागवत सोमनाथ घायतडक या सात जणांवर पाचोडच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. खासदार संदीपान भुमरे यांनी रुग्णालयात विद्यार्थ्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.