Diwali Festival 2023 : छत्रपती संभाजीनगर विभागातील सात आगारातून दिवाळीसाठी विविध मार्गांवर जादा बस

दिवाळीसाठी होणारी गर्दी लक्षात घेऊन एसटी महामंडळाने विविध मार्गावर जादा बसगाड्या सोडण्याचा निर्णय
for diwali msrtc extra buses travel chhatrapati sambhajinagar marathi news
for diwali msrtc extra buses travel chhatrapati sambhajinagar marathi newsesakal
Updated on

छत्रपती संभाजीनगर : दिवाळीसाठी होणारी गर्दी लक्षात घेऊन एसटी महामंडळाने विविध मार्गावर जादा बसगाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. छत्रपती संभाजीनगर विभागातील सात आगारातून विविध मार्गावर जादा बसेस सोडल्या जाणार आहेत.

या सर्व जादा बसेस ९ नोव्हेंबरपासून सोडण्यात येतील, अशी माहिती विभागीय वाहतूक नियंत्रक अधिकारी पंडित चव्हाण यांनी दिली. मध्यवर्ती बसस्थानक, सिडको बसस्थानक, पैठण, सिल्लोड, वैजापूर, कन्नड आणि गंगापूर या आगारातून जादा बसेस सोडण्यात येणार आहेत. सिडको आगारातून अकोला, रिसोड, महेकर,

जालना तर मध्यवर्ती बसस्थानकातून अकोला, नांदेड, बुलढाणा, पैठण आगारातून पुण्यासाठी चार बसेस, सिल्लोड येथून दोन पुणे, दोन बुलढाणा, एक नाशिक, वैजापूर आगारातून एक बुलढाणा, एक पुणे, नाशिक, कन्नड आगारातून पुणेसाठी दोन बसेस, तीन बसेस धुळे, गंगापूर आगारातून दोन पुणे, गंगापूर ते पुणे दोन, एक नाशिक, एक शिर्डी अशा जादा बसेस सोडण्यात येणार आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()