Sambhaji Nagar News : गाव स्वच्छ ठेवण्याच्या उद्देशाने वाळूज ग्रामपंचायतीने ठिकठिकाणी कचरा न टाकण्याचे फलक

फलकाच्या ठिकाणीच कचरा ; वाळूजकरांकडून ग्रामपंचायतीचे आदेश धाब्यावर
sambhaji nagar
sambhaji nagar sakal
Updated on

वाळूज : गाव स्वच्छ ठेवण्याच्या उद्देशाने वाळूज ग्रामपंचायतीने ठिकठिकाणी कचरा न टाकण्याचे फलक लावले. मात्र, आजपर्यंत कारवाई न झाल्याने ग्रामपंचायतीचे आदेश धुडकावून लावत ग्रामस्थ बिनधास्तपणे पाहिजे तिथे कचरा टाकून मोकळे होत आहेत. त्यामुळे ग्रामपंचायतीचे सूचना फलक एक शोभेची वस्तू ठरत आहे.

यंदाचे वर्ष हे महात्मा गांधी यांचे जन्मशताब्दी वर्ष असल्याने जनजागृतीसाठी ग्रामपंचायतीने जनजागृतीसाठी शालेय विद्यार्थ्यांची फेरी काढली होती. त्यातून जागृती केली गेली. विविध चौकांत कचरा न टाकण्याचे सूचना फलक लावले. त्यातून कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला. परंतु ग्रामपंचायतीच्या या आवाहनाला ग्रामस्थांनी सपशेल धुडकावून लावत प्रतिसाद दिला नाही. ज्या चौकात ग्रामपंचायतीकडून कारवाईच्या इशाऱ्यांचे फलक लावले गेले, ग्रामस्थांनी अगदी त्या ठिकाणीच कचरा आणून टाकण्याचे काम केले. यासाठी त्यांनी पहाटेची वेळ निवडली.

महामार्गावर चार ठिकाणे

ग्रामस्थांनी कचरा टाकण्यासाठी हनुमान नगरचा दर्शनी भाग, लायननगरकडे जाणारा टी पॉइंट, जिल्हा परिषदेच्या वाळूज माध्यमिक शाळेचे प्रवेशद्वार व लांझी चौक परिसराची निवड केली आहे. यातून परिसराला अगदी कचराकुंडीचे स्वरूप आले आहे. या कचऱ्यातील टाकाऊ भाजीपाला व फळे सडल्याने त्याची अतिशय दुर्गंधी सुटली आहे. परंतु ग्रामपंचायतीने फलक लावण्याव्यतिरिक्त कोणतीही कारवाई केली नाही. लावलेल्या फलकांचा कुठलाही परिणाम ग्रामस्थांवर झाला नाही. त्यामुळे बिनधास्तपणे कचरा रस्त्याच्या कडेला टाकून मोकळे होतात. ग्रामपंचायतीने कारवाईची मोहीम प्रभावीपणे राबविण्याची गरज आहे.

प्रग्रामपंचायतीने घंटागाडी दररोज फिरवावी. काही दिवस त्रास होईल. मात्र,स वय लागल्यानंतर ग्रामस्थ बरोबर कचरा टाकतील.

- शेख रशीद शेख फतरू, लायननगर, वाळूज.

सर्वच गोष्टी सूचना फलक लावल्यामुळे पूर्णत्वाला जातात, असे नाही. तरीही त्यावरील सूचनेप्रमाणे कारवाईची अंमलबजावणी व्हावी. कारवाईचा देखावा नको.

- तुकाराम वाघ, साठेनगर, वाळूज.

गावातून घंटागाडी दररोज फिरवली जाते. तरीही ग्रामस्थ कचरा रस्त्याच्या कडेला टाकून मोकळे होतात. आता ग्रामपंचायतीने अनेक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांवर लक्ष ठेवले जात आहे. येथून पुढे कचरा टाकल्यास त्यांना कळेल कायदा काय असतो ते.

- उत्तमराव भोंडवे, ग्रामविकास अधिकारी, वाळूज ग्रामपंचायत........

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()