स्कूल बस अधिनियमांचा विसर, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत प्रशासनासह शाळांचेही दुर्लक्ष

तसेच शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षित प्रवासाची जबाबदारी संबंधित मुख्याध्यापकांची आहे. मात्र, या नियमांचे पालन करण्याकडे सर्रास दुर्लक्ष होताना दिसत आहे.
School
SchoolSakal
Updated on

शासनाने सुरक्षित विद्यार्थी वाहतुकीसाठी २०१२ मध्ये नियमावली तयार केलेली आहे. त्यानुसार स्कूल बससेवा सुरू आहे किंवा नाही, त्यात किती विद्यार्थ्यांची वाहतूक केली जाते? याची पाहणी करण्याचे काम संबंधित स्कूल बस समितीकडे देण्यात आले आहे. तसेच शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षित प्रवासाची जबाबदारी संबंधित मुख्याध्यापकांची आहे. मात्र, या नियमांचे पालन करण्याकडे सर्रास दुर्लक्ष होताना दिसत आहे.

विद्यार्थी वाहतूक सुरक्षितपणे व्हावी, यासाठी शासनाच्या गृह विभागाने २०१२ मध्ये नियमावली जारी केली आहे. या आदेशानुसार शाळेत स्कूल बस समिती स्थापन होणे आवश्यक आहे. याशिवाय जिल्हा स्कूल बस सुरक्षितता समितीने वेळोवेळी शहरातील विविध शाळांची बैठक घेऊन आवश्यक उपाययोजना करण्याबाबत सूचना देणे आवश्यक आहे. परंतु, शाळा सुरू होऊन महिना उलटून गेला तरी, बहुतांश शाळांमध्ये स्कूल बस समितीच स्थापन करण्यात आलेली नाही. तसेच शालेय परिवहन समित्या फक्त कागदावरच आहेत. तीन महिन्यांतून एकदा समितीची बैठक घेणे बंधनकारक आहे. याकडे शाळांसह शिक्षण विभागाने साफ दुर्लक्ष केलेले दिसत आहे.

आरटीओचे शालेय वाहनांसाठी नियम

शालेय विद्यार्थी वाहतूक परवाना आवश्यक

वाहनांना पिवळा रंग असावा

वाहनांवर विद्यार्थ्यांचे सांकेतिक चित्र

वाहनांचा विमा असावा

आसन क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी बसवू नये

वेगमर्यादा ४० ते ५० असावी

वेगावर नियंत्रण हवे

स्मार्टसिटीअंतर्गत शहरातील विविध रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्यात येत आहे. त्यामुळे नागरिक व वाहनचालकांच्या अडचणी सुटलेल्या आहेत. परंतु, सकाळी शाळेत वेळेवर पोचण्यासाठी रिक्षा, व्हॅन आणि स्कूल बस गल्लीबोळातून अगदी सुसाट धावतात. अनेकवेळा वाहनचालकांच्या कानाला मोबाइल असतो आणि एका हाताने स्टिअरिंग धरलेले असते. या क्षमतेपेक्षा जास्त वाहतूक करणाऱ्या रिक्षांचा वेग कितीतरी पटीने जास्त असतो. अशा वाहनांचे नियंत्रण सुटल्यास मोठा अनर्थ घडू शकतो. त्यामुळे विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहनांनी वेगावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे.

School
Pune University Exam : पावसामुळे विद्यापीठाच्या परीक्षा रद्द; लवकरच नवे वेळापत्रक होणार जाहीर

अल्पवयीन मुलांच्या हातात वाहने

शाळा सुटल्यानंतर अनेकवेळा अल्पवयीन मुले दुचाकीने ट्रिपल सीट प्रवास करताना दिसतात. या मुलांकडे वाहन चालवण्याचा परवाना नसतो. अशावेळी दुर्घटना घडल्यास कोण जबाबदार राहणार? असा प्रश्न उपस्थित होतो. प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.

अटी व नियमावली

स्कूल बसला वाहन वेग नियंत्रक लावावे

स्कूल बसमध्ये प्रशिक्षित चालक, पुरुष, महिला परिचर हवेत

शाळेच्या बसमध्ये अग्निशमन यंत्रणा बसवावी

बसमध्ये निर्धारित क्षमतेपेक्षा जास्त वाहतूक करू नये

प्रथमोपचार संच व इतर साहित्य आवश्यक

खिडक्यांमध्ये तीन आडव्या दांड्या असाव्यात

जेवणाचे डबे, पाण्याची बॉटल ठेवण्यासाठी व्यवस्था

सुरू बसमध्ये दरवाजे बंद असावेत

धोक्याचे इशारा देणाऱ्या लाइटची व्यवस्था करावी

शाळेची ओळख दर्शविणारी पट्टी नियमानुसार लावावी

स्कूल बसमध्ये सहवर्ती किंवा अटेंडंट असावा

बसमधील आपत्कालीन खिडकी सहज उघडेल, तसेच ती उघडल्यास एका सायरन किंवा लाइटद्वारे चालकाला समजेल अशी व्यवस्था असावी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.