तेलगंणमधील एका काकांचे वृद्धापकाळाने सोमवारी (ता. २२) निधन झाले. अंत्यसंस्कारासाठी हे बंधू कारने तेलंगणाला गेले होते.
करमाड (ता. छत्रपती संभाजीनगर) : दुभाजकाला कार धडकून कुटुंबातील चौघांचा मृत्यू तर तरुण जखमी झाला. मृत हे गुजरातमधील असून एकमेकांचे सख्खे-चुलत बंधू आहेत.
नातेवाइकाच्या अंत्यविधीसाठी हे सर्व कारने निघाले होते. त्यावेळी समृद्धी महामार्गावरील (Samruddhi Highway Accident) वरझडी शिवारात बुधवारी पहाटे पाचच्या सुमारास ही दुर्घटना घडली.
मृतांत सुरेशभाई रामू गौड (वय ३८), श्रीनिवास रामू गौड (३६, सख्खे बंधू) आणि संजय राजनभाई गौड (४३), कृष्णा राजनभाई गौड (४८, सर्व रा. सुरत, गुजरात) या सख्ख्या बंधूंचा समावेश आहे.
प्रत्यकी दोघे एकमेकांचे चुलतबंधू आहेत. मृत सुरेशभाई यांचा मुलगा भार्गव गौड (१९) किरकोळ जखमी झाला. गौड कुटुंब मूळचे तेलंगणचे असून व्यवसायानिमित्त सुरतला वास्तव्याला होते.
तेलगंणमधील एका काकांचे वृद्धापकाळाने सोमवारी (ता. २२) निधन झाले. अंत्यसंस्कारासाठी हे बंधू कारने तेलंगणाला गेले होते. तेथून सुरतकडे परतताना समृद्धी महामार्गावरील वरझडी शिवारात भरधाव कार दुभाजकाला धडकली. या अपघातात चौघांचा जागीच मृत्यू झाला.
कारमध्ये पाठीमागे बसलेला भार्गव बचावला. चौघांपैकी नेमके कार कोण चालवित होते, याबाबत महिती मिळू शकली नाही. चालकाला पहाटे डुलकी लागल्याने ही दुर्घटना घडली असावी, असे सांगितले जाते.
महामार्गावरील अन्य वाहनचालक, महामार्ग पोलिस, करमाड पोलिसांनी सर्वांना रुग्णालयात दाखल केले. तत्पूर्वी चौघांचा मृत्यू झाला होता. भार्गव याच्यावर उपचार सुरू आहेत.
तो काही बोलण्याच्या मनःस्थितीत नसल्याने अपघाताविषयी अधिक माहिती पोलिसांना मिळू शकली नाही. करमाड पोलिसांनी घटनेची नोंद केली. निरीक्षक मुरलीधर खोकले तपास करीत आहेत.
याच महामार्गावर करमाडदरम्यान वरझडी शिवारातच शनिवारी (ता. २०) पहाटे ट्रक- ट्रेलरची धडक झाली होती. यात जीवितहानी झालेली नसली तरी अपघातानंतर ट्रकने पेट घेतला. ट्रकमध्ये देशी दारूचे बॉक्स होते. त्यातील बाटल्या फुटून ट्रक खाक झाला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.