Latur News : लुटमारीच्या तयारीतील चौघे गजाआड

सराफा व्यापाऱ्याची पळविणार होते बॅग, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
crime news latur
crime news latursakal
Updated on

लातूर : येथे सराफा व्यापाऱ्याची सोन्याच्या दागिन्यांनी भरलेली बॅग लुटण्याच्या तयारीत असलेल्या चौघांना पोलिसांनी पकडले आहे. येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली आहे. अटक करण्यात आलेल्या चौघांपैकी दोघे हे नाशिकचे आहेत. पोलिसांच्या या कारवाईमुळे गंभीर गुन्हा घडण्यापासून रोखला गेला.

येथील पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांचे आदेशान्वये स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संजीवन मिरकले यांचे नेतृत्वात जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडलेले मालाविषयक गुन्हे उघडकीस आणण्याकरिता प्रयत्न सुरु आहेत. याकरिता पोलिसांची पथकेही तयार करण्यात आली आहेत. येथे सोमवारी (ता. चार) जुन्या गूळ मार्केट परिसरातील असलेल्या वाहनाच्या पार्किंग परिसरामध्ये काही अनोळखी व्यक्ती संशयितरित्या फिरत होते, ते सराफा व्यापाऱ्याची सोन्याच्या दागिन्याची बॅग लुटण्याच्या तयारीत आहेत, अशी माहिती पोलिस पथकाला मिळाली होती.

crime news latur
Latur Water Crisis : जळकोटला ९० टक्के जलस्रोत तळाला; हिवाळ्यापासूनच तालुक्यात पाण्याची टंचाई

त्यानंतर पोलिसांनी तेथे जाऊन संतोष अशोक पटेकर (वय २६), निलेश ऊर्फ भारत ऊर्फ नाना बापू क्षीरसागर (वय २५, दोघे रा.आम्रपालीनगर, कॅनल रोड, उपनगर जिल्हा नाशिक) व ज्ञानेश्वर शरद पोतदार (वय ३१, रा. खोरी गल्ली, लातूर) .

आणि अक्षय लक्ष्मण महामुनी (वय २८, रा. पाच नंबर चौक, पंचवटीनगर, लातूर) यांना ताब्यात घेतले. त्यांच्या ताब्यात असलेल्या पिशवीची झडती घेतली तेव्हा त्यामध्ये लोखंडी तलवार, एक लोखंडी बतई व एक दातऱ्या असलेला धारदार विळा मिळून आला आहे. हे साहित्य पोलिसांनी जप्त केले आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संजीवन मिरकले यांचे नेतृत्वात सहायक पोलिस निरीक्षक प्रवीण राठोड, सहायक पोलिस उपनिरीक्षक संजय भोसले, पोलिस अंमलदार सुधीर कोळसुरे, सिद्धेश्वर जाधव, मोहन सुरवसे, रियाज सौदागर, योगेश गायकवाड, संतोष खांडेकर, प्रदीप चोपणे यांनी केली. या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस अंमलदार कोळसुरे यांचे फिर्यादीवरून गांधी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच चौघांना ताब्यात घेण्यात आले आहे.

crime news latur
Latur News : वीज गेली, डोंट वरी; तुमची डीपी येईल जागेवरी

पाच दिवसांपूर्वी रेकी

दररोज काही सराफा व्यापारी सकाळी आपले वाहन पार्किंगमध्ये लावून सोन्याच्या दागिन्याची बॅग दुकानात घेऊन जातात. रात्री ती बॅग घरी नेतात. ही बाब लक्षात घेत अंधाराचा फायदा घेऊन सराफा व्यापाऱ्याची सोन्याच्या दागिन्याची बॅग लुटण्याचा कट या चौघांनी केला होता. त्यासाठी लातूर येथील दोघांनी चार ते पाच दिवसापूर्वी त्यांच्या ओळखीच्या नाशिक येथील दोघांना येथे बोलावून घेतले. तीन-चार दिवसापासून पार्किंग परिसराची रेकी केली होती. रात्री एका सराफा व्यापारी सोन्याच्या दागिन्याची बॅग घरी घेऊन जात असताना अंधाराचा फायदा घेऊन शस्त्राचा धाक दाखवून लुटणार होतो, असे संशयितांनी सांगितले. दोन जणांचे देणे असल्याने व कर्जबाजारी झाल्याने आर्थिक विवंचनेतून,अडचणीमुळे पैसे मिळवण्यासाठी हा प्रकार केल्याचे संशयितांनी पोलिसांच्या चौकशीत कबूल केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.