Aurangabad Accident|पाचोडजवळ दोन अपघातांत चौघे जण जखमी, एक गंभीर

दोन वेगवेगळ्या अपघातांत चार जण जखमी झाले आहेत.
Aurangabad Accident
Aurangabad Accidentesakal
Updated on

पाचोड (जि.औरंगाबाद) : दोन वेगवेगळ्या अपघातांत चार जण जखमी झाल्याची घटना सोमवारी (ता.१३) दुपारी बाराच्या सुमारास घडल्या. दरम्यान अपघाताग्रस्तांना तातडीने पाचोड येथील (ता.पैठण) (Paithan) ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात येऊन एका गंभीर असलेल्यास औरंगाबादला पाठविण्यात आले. रमेश गायके (वय ४०, रा.शिरनेर, ता.अंबड) , किशोर कानडे, लताबाई कानडे, सत्यशीला कोरडे (रा.औरंगाबाद) (Aurangabad) अशी जखमींची नावे आहेत. या संबंधी अधिक माहिती अशी, शिरनेर (ता.अंबड) येथील रमेश गायके हे काही कामानिमित्त पाचोड येथे आले होते. ते आपले येथील कामे आटोपून दुचाकीने अंबडला जात होते. पाचोड-अंबड रस्त्यावर पाचोड (खूर्द) शिवारात त्यांच्या दुचाकीस (एमएच २१ एएफ ०७९१) अंबडकडून येणाऱ्या भरधाव कारने (एमएच. २१ बी.एफ.६८९०) समोरासमोर जोराची धडक दिल्याने दुचाकीवरील रमेश हा उंच उडून कारच्या समोरील काचेवर येऊन आदळला. (Four People Injured In Accident Near Pachod Aurangabad Accident News)

Aurangabad Accident
लालपरीचे चाके संपातच रुतलेले! विद्यार्थी सायकलवर गाठतात शाळा

यात त्याच्या डोक्याला जबर मार लागला. शिवाय यांत दुचाकीचे मोठे नुकसान होऊन कारच्या समोरील भागाचा चुराडा झाला. हा अपघात घडताच रस्त्यावर ये-जा करणाऱ्या वाहनधारकांनी त्यास तातडीने पाचोड येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. त्याच्यावर प्रथमोपचार करुन पुढील उपचार्थ औरंगाबादला पाठविण्यात आले. दुसरी घटना औरंगाबाद-सोलापुर राष्ट्रीय महामार्गावर भोकरवाडी टोलनाक्याजवळ घडली.

Aurangabad Accident
वडिलांच्या वाढदिवसाला मुलीचे अनोखे भेट, कॅन्सर रुग्णांना केले केस दान

औरंगाबाद येथील किशोर कानडे, लताबाई कानडे, सत्यशीला कोरडे हे तिघे जण दुचाकीने नातेवाईकांच्या लग्न सोहळ्यास उपस्थित राहण्यासाठी जात असताना त्यांच्या दुचाकीचे पाठीमागचे टायर फुटल्याने दुचाकीवरील दुचाकीचालकाचा नियंत्रण सुटून ते रस्त्यावर पडून त्यांच्या डोक्यासह हाता-पायांना जबर मार लागला. यात ते जखमी झाले. या तिघांना पाचोड येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.