Chhatrapati Sambhajinagar Crime : म्हणे, जादू करून देतो एक लाखाचे तीन लाख!

एक जण ताब्यात, साथीदार लाखाची रक्कम घेऊन पसार
fraud of to prevent high return on investment 1 lakh to 3 lakh fake note scam
fraud of to prevent high return on investment 1 lakh to 3 lakh fake note scamSakal
Updated on

छत्रपती संभाजीनगर : एक लाख रुपयांचे जादूने तीन लाख रुपये करून देतो, असे आमिष दाखवत दोन तरुणांना मुलांच्या खेळण्यातील नोटा देत फसवणूक केली. १६ मे रोजी सायंकाळी सातला चिकलठाणा भागातील हॉटेल शिवनेरीजवळ हा प्रकार घडला.

फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर या तरुणांनी एकाला जागीच पकडले असून, त्याचा साथीदार एक लाखाची रक्कम घेऊन पसार झाला. या प्रकरणी सिडको एमआयडीसी पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

या प्रकरणी अमोल ज्ञानदेव भालेराव (वय २८, रा. संजयनगर, मुकुंदवाडी) यांनी तक्रार दाखल केली. यामध्ये अमोलचा नाशिक येथील मित्र सोनू शेजवळ याला बुलढाणा येथील शेख शाहरूख नावाच्या व्यक्तीने कॉल करून मी जादूने एका लाखाची रक्कम तीनपट करून देतो, असे आमिष दाखवले होते. या आमिषाला भुलून शेजवळने होकार देत अमोलला हा प्रकार सांगितला. या गोष्टीला अमोलदेखील तयार झाला. शाहरूखने दोघांना चिकलठाणा भागात बोलावले.

डोळे बंद करायला लावले

या ठिकाणी गेल्यानंतर शेजवळ आणि अमोल यांना दुचाकीवर आलेले शेख शाहरूख आणि त्याचा साथीदार गुड्डू बगदादी भेटले. या ठिकाणी अमोल आणि शेजवळ यांनी त्यांच्याकडचे ५०० रुपयांच्या नोटा असलेले १ लाखाचे बंडल शाहरूखला दिले.

यावेळी शाहरूखने त्यांना दोन मिनिटे डोळे बंद करायला सांगितले. दोघांनी डोळे बंद करून काही वेळाने उघडले. यावेळी शाहरूखने त्यांच्या हातात पाचशे रुपयांच्या नोटा असलेले पॉलिथीनच्या बॅगमध्ये गुंडाळलेले बंडल दिले.

अमोल आणि शेजवळ बंडल उघडून बघत असताना गुड्डू बगदादी हा एक लाखाची रक्कम घेऊन पसार झाला. शाहरूख पळत असताना अमोल आणि शेजवळने त्याला पकडले. दोघांनी बंडल उघडून पाहिले असता वरची आणि खालची नोट पाचशेची आणि आतमध्ये खेळण्यातल्या ‘भारतीय बच्चों का पाँच सौ अंक’ असे लिहिलेल्या खेळण्यातल्या नोटा आढळल्या.

या दोघांनी आरोपी शेख शाहरूखला पकडून सिडको एमआयडीसी पोलिसात हजर केले. या प्रकरणी अमोलच्या तक्रारीवरून आरोपी शेख शाहरूख आणि गुड्डूविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.