वाळूज : वाळूज परिसरातील जमिनीला सध्या सोन्याचा भाव आल्याने फसवणूक करणाऱ्या प्रॉपर्टी एजंटांच्या टोळ्या सक्रिय झाल्या आहेत. असाच एक प्रकार उघडकीस आला. विक्री केलेल्या जमिनीचे क्षेत्र सातबारा उताऱ्यावर संबंधित शेतकऱ्यांच्या नावे नोंद असल्याने त्याआधारे जमिनीची दुसऱ्यांदा विक्री करीत रजिस्ट्रीही केली केल्याचे प्रकरण उघडकीस आले. ही घटना वाळूजलगतच्या इसारवाडी फाटा ते बिडकीनदरम्यानच्या महामार्गालगत गुरुधानोरा (ता. गंगापूर) शिवारात घडली. यासंदर्भात वाळूज पोलिसांत सहा जणांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला असून, तिघांना अटक करण्यात आली.