छत्रपती संभाजीनगर : शहरात आलेल्या गावाकडच्या मित्राला शहरातील व्यावसायिक मित्राने खाऊ पिऊ घातले, मुक्कामाची सोय नसल्याने स्वतःच्या घरीही नेले. मात्र, ज्याने आसरा दिला, त्याच्याच घरात डल्ला मारत मोबाईल, स्मार्ट वॉच चोरुन घेत मध्यरात्री पोबारा केला. इतकेच नव्हे, तर मित्राच्या मोबाईलमधील "फोन पे" मधून स्वतःच्या खात्यात चक्क १ लाख २१ हजा ८७५ हजार रुपये वळती करुन घेतले. हा प्रकार २१ ऑगस्ट रोजी जुबली पार्क परिसरात उघडकीस आला.
या प्रकरणात गावच्या मित्राविरोधात सिटी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अविनाश प्रभाकर आगलावे (२७, रा. भिंगी आडगाव, ता.जि.हिंगोली) असे त्या आरोपी मित्राचे नाव आहे, अशी माहिती सिटी चौक पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षक निर्मला परदेशी यांनी दिली. याप्रकरणी प्रवीण दशरथ साठे (३१, रा. जुबली पार्क परिसर) हे फिर्यादी आहेत. प्रवीणचा गावाकडचा मित्र आरोपी अविनाश हा शहरात आला होता.
गावचा मित्र आला म्हणून फिर्यादीने त्याला खाऊ पिऊ घातले, त्यांनतर मुक्कामाची सोय नसल्याने संध्याकाळी घरी घेऊन गेला. दरम्यान, आरोपी अविनाश याने प्रवीणच्या मोबाईलचा फोन पे युपीआय आयडी पासवर्ड पाहिला होता. दरम्यान आरोपीने २० ऑगस्टच्या मध्यरात्री मित्राचा मोबाईल, स्मार्ट वॉच घेऊन पोबारा केला.
दुसऱ्या दिवशी सकाळी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर मित्र आणि मोबाईल नसल्याने त्याच्यावर संशय व्यक्त करण्यात आला खरा, आरोपी अविनाश याने प्रविणच्या खात्यातील पैसे स्वतःच्या खात्यावर वळती केल्यानंतर मित्र आरोपी निघाल्याचे समोर आले.
पोलिसांनी तत्काळ आरोपी अविनाशचे खाते फ्रीज केले, तोपर्यंत आरोपीने खात्यातून ५० हजार रुपये काढून घेतले होते. आरोपी अविनाश याच्याविरोधात परभणीसह इतर ठिकाणी काही गुन्हे दाखल असल्याचे समोर आल्याची माहिती निरीक्षक श्रीमती परदेशी यांनी दिली. आरोपी अविनाश याचा शोध घेण्यात येत आहे. याप्रकरणी दाखल गुन्ह्याचा तपास स्वतः निरीक्षक निर्मला परदेशी करत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.