छत्रपती संभाजीनगर : आठवडाभरापूर्वी लसणाचे भाव कमी होते. आज लसणाच्या भावात ४० ते ५० रुपयांनी वाढ झाली. सध्या २८० ते ४५० रुपये एवढा भाव आहे..कांद्याच्या दरातही वाढ झाली असून, आता ३० ते ४० रुपये किलो भाव आहे. दरम्यान, मिरचीचे दर ३० ते २० रुपयांची कमी झाल्याचे रविवारी १० बघायला मिळाले. सध्या ४० ते ५० रुपये किलोने मिरची मिळत आहे.दिवाळीनंतर आठवडाभर सर्व मार्केट बंद होते. त्यानंतर भाजीपाल्याच्या भावात वाढ झाल्याचे काही विक्रेत्यांनी सांगितले. किरकोळ बाजारात आधी मेथीची आणि पालकाची गड्डी दहा रुपयाला मिळत होती. मात्र, आता त्यासाठी २० रुपये मोजावे लागत आहेत..फुलांच्या भावात घसरणदहा ते बारा दिवसांपूर्वी दिवाळीमुळे फुलांचे दर वाढले होते. पण, आता त्यात घसरण झाली आहे. झेंडू ३० ते ४० रुपये किलो, शेवंती ६० ते ७० रुपये, बिजली ५० रुपये, गलंडा ३० ते ४० रुपये किलो दराने मिळत आहे. पण, गुलाबाचा भाव आधीप्रमाणे २०० रुपये किलो आहे..सीताफळ, पेरू स्वस्तसफरचंदाच्या दरात २० ते ४० रुपयांनी वाढ झाली. आता १०० रुपये ते १२० रुपये किलो भाव आहे; सीताफळाचे दर निम्म्यावर झाले असून, २० रु. किलो झाले आहेत.पेरूचा भाव आधी ५० रुपये किलो होता. आता ३० रुपये एवढा आहे. त्याचबरोबर संत्री ३० ते ५०, डाळिंब ५०, पपई ४०, अंजीर ८०, केळी (डजण) ३० असे भाव होते..वडापावला बटाट्याच्या दरवाढीचा तडका.पालेभाज्यांचे दर (किलोत)वालाच्या शेंगा १८ ते २० रुपये, गिलके ४० ते ५०, भरताचे वांगे २०, कांद्याची पात १० (गड्डी), काकडी १० रुपये, गवार ३० ते ६० रुपये, भोपळा १५ ते १६, भेंडी (गावरान) ५० ते ६०, साधी भेंडी ४० रुपये, कारले ५० ते ६० रुपये, फुलकोबी ८० ते ९० रुपये, कोथिंबीर ८ ते १० (गड्डी), शेपू १०(गड्डी), मेथी २०(गड्डी), पालक २० (गड्डी), चिवळ ३०, बटाटे ३० ते ४०, शेवगा ८० किलो. अद्रक ५० ते ६०..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.