छत्रपती संभाजीनगर : गेली कित्येक महिन्यांपासून घाऊक बाजारात लसणाची आवक कमी होत आहे. उत्पादनाअभावी बाजारात लसणाचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे लसणाच्या दरात सतत वाढ सुरू आहे. किरकोळ बाजारात लसणाची किंमत ४०० रुपये झाली आहे. चव वाढवणारा लसूण हा भाजीतून गायब झाल्यामुळे भाजी बेचव झाली आहे.
लसणाच्या दरात वाढ झाल्याने खारीक, खोबरा, काजू, बदाम किंवा सुका मेवा यांच्या दराची स्पर्धा सुरू झाली आहे. त्यामुळे लसूण खाण्याऐवजी सुकामेवाच खावा की काय, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. प्रत्येक स्वयंपाकघरात लसूण हा पदार्थ सहजतेने सापडत होता.
मुळात लसणाचा हा वापर पदार्थांची चव वाढवण्यासाठी केला जात असल्याने जेवणात याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. परंतु, आता लसणाचे दर वाढतच असल्यामुळे किचनमधून लसूण गायब होताना दिसत आहे.
लसणाच्या उत्पादनात घट होत असल्याने भाव वाढत आहेत. त्यामुळे आधीच महागाईमुळे त्रस्त असलेल्या नागरिकांना वाढलेल्या लसणाच्या दरामुळे महागडा लसूण विकत घ्यायचा तरी कसा, असा प्रश्न पडत आहे. गेल्या काही वर्षांपासून लसणाच्या लागवडीत घट होत आहे.
त्यामुळे शेतकऱ्यांनी साठवलेला लसूण विक्रीसाठी बाहेर काढला होता. त्यामुळे यंदा लसणाची साठवणूक कमी आणि ग्राहकांची मागणी मोठ्या प्रमाणात होत आहे. दरम्यान, ऑगस्टच्या शेवटी आणि सप्टेंबर सुरवातीला सर्वदूर झालेल्या पावसाने लसणाचे बरेच नुकसान झाले.
चांगल्या दर्जाचा लसूण कमी प्रमाणात बाजारात येऊ लागला. सध्या बाजारात आवक झालेल्या उच्चतम दर्जाच्या लसणाला २५ ते २७ हजारांदरम्यान दर मिळतो आहे. दुय्यम प्रतीच्या लसणाला सुद्धा सध्या १५ हजारांपासून दर मिळतो आहे. किरकोळ विक्री महागली किरकोळ बाजारात दर्जात्मक लसूण थेट ३८० ते ४०० रुपये किलोने व्यापारी विकत आहेत. दुय्यम लसूणही २०० ते २५० रुपयांपासून विक्री होतो आहे. दोन्ही प्रकारच्या लसणामध्ये दीडपटीचा फरक आहे.
आवक कमी झाली आहे. मागणी वाढली असून, लसणाच्या दरात वाढ झाली. त्यामुळे ग्राहक कमी प्रमाणात खरेदी करीत आहेत.
— योगेश फुले, विक्रेता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.