Ghati Hospital : कामगारांच्या ईपीएफमध्ये दीड लाखाचा अपहार

कोरोना काळात घाटी हॉस्पिटल येथे सफाई कामगार म्हणून काम केलेल्या कामगारांच्या ईपीएफची रक्कम खात्यात जमा न करता त्याचा अपहार करण्यात आला. जून २०२० ते जुलै २०२१ या कालावधीत हा प्रकार घडला.
Ghati Hospital
Ghati Hospitalsakal
Updated on

छत्रपती संभाजीनगर : कोरोना काळात घाटी हॉस्पिटल येथे सफाई कामगार म्हणून काम केलेल्या कामगारांच्या ईपीएफची रक्कम खात्यात जमा न करता त्याचा अपहार करण्यात आला. जून २०२० ते जुलै २०२१ या कालावधीत हा प्रकार घडला. या प्रकरणी ग्लोबल टोटल सोल्युशन कंपनीच्या संचालिकेविरोधात बेगमपुरा पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी यशपाल बाबाराव गवई (वय ३२, रा. भावसिंगपुरा) याने तक्रार दाखल केली आहे. गवई आणि त्याच्यासोबत कामगारांनी कोरोना काळात ग्लोबल टोटल सोल्युशन कंपनीच्यावतीने घाटी हॉस्पिटल येथे सफाईकाम केलेले आहे.

Ghati Hospital
Sambhaji Nagar : शंभर कोटींच्या निविदांची लगीनघाई ; लोकसभा आचारसंहितेपूर्वी महापालिकेत लगबग,विकासकामांची प्रक्रिया महिनाभरात होणार अंतिम

यावेळी कंपनीच्या संचालिका सुरेखा सुरेंद्र कोतवाल यांनी कामगारांच्या ईपीएफ कपातीची रक्कम त्यांच्यात खात्यात जमा करण्यात येईल, असे आश्वासन दिले. मात्र, तीन वर्षांपेक्षा जास्त कालावधी उलटला, तरी ही रक्कम जमा करण्यात आली नव्हती. ही रक्कम एकूण १ लाख ५१ हजार आहे. या प्रकरणी गवई यांच्या तक्रारीवरून पोलिस ठाण्यात आरोपी महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

Ghati Hospital
Ghati Hospital : ‘नॉर्मल’ प्रसूतीवर घाटी रुग्णालयाचा भर; ‘सिझेरियन’चे प्रमाण घटते

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.