‘मुख्यमंत्रिपदाचा कार्यभार आदित्य ठाकरेंकडे द्या’;संभाजी पाटील निलंगेकर

कोरोनाचे संकट पुन्हा वाढत असताना कायदा सुव्यवस्था स्थितीही बिघडली आहे.
aditya thakrey
aditya thakreysakal
Updated on
Summary

कोरोनाचे संकट पुन्हा वाढत असताना कायदा सुव्यवस्था स्थितीही बिघडली आहे.

लातूर : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची(third wave of corona) भीती वाढत असताना राज्यात सर्वच आघाड्यांवर प्रचंड अनागोंदी आहे. प्रकृतीच्या कारणामुळे प्रदीर्घ काळ राज्य कारभारापासून दूर असलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(cm uddhav thakrey) यांनी आता तरी राज्याच्या प्रमुखपदाची सूत्रे उपमुख्यमंत्री अजित पवार(deputy cm ajit pawar) किंवा अन्य सहकाऱ्याकडे सोपवावी, राज्याला अनागोंदीपासून वाचवावे अशी मागणी भाजपचे नेते, आमदार संभाजी पाटील निलंगेकर(mla sambhaji patil Nilangekar) यांनी केली.

aditya thakrey
देव देव्हाऱ्यात नाही देव नाही दिवालयी!

मुख्यमंत्री ठाकरे यांच्या प्रकृती लवकरच बरी व्हावी, अशी सदिच्छा व्यक्त करत अजित पवार किंवा राष्ट्रवादी काँग्रेसवर विश्वास नसेल तर आदित्य ठाकरेंकडे (aditya thakrey)मुख्यमंत्रिपदाचा कार्यभार सोपवा, पण राज्याला पूर्णवेळ मुख्यमंत्री द्या, असेही त्यांनी पत्रकात म्हटले आहे. २२ नोव्हेंबरला मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावर शस्त्रक्रिया झाली. तेव्हापासून पूर्णवेळ मुख्यमंत्री नसल्याने मंत्रिमंडळही भरकटले आहे. कोरोनाचे संकट पुन्हा वाढत असताना कायदा सुव्यवस्था स्थितीही बिघडली आहे. बलात्कार, खून, दरोडे, फसवणूक, भ्रष्टाचाराची प्रकरणे वाढत आहेत. राज्य दिशाहीन झाल्याचीच ही लक्षणे आहेत. अशा स्थितीत, प्रकृती कारणास्तव मुख्यमंत्री दैनंदिन कारभारात लक्ष घालू शकत नसल्याने पदभार अन्य ज्येष्ठ सहकाऱ्याकडे सोपविण्याची प्रथा अमलात आणण्याची हीच वेळ आहे, असे निलंगेकर यांनी म्हटले आहे.

aditya thakrey
पुण्याने नवीन कोरोना रुग्णांचा शुक्रवारी १०००० चा आकडा केला पार

मुख्यमंत्री ठणठणीत बरे होवोत

राज्यातील जनता अनेक समस्यांचा सामना करीत आहे. मुख्यमंत्री ठाकरे(uddhav thakrey) घराबाहेरही पडू शकत नाहीत. मंत्रालयापर्यंत जाणेही त्यांना शक्य होत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी(pm narendra modi) यांनी गुरुवारी घेतलेल्या ऑनलाइन बैठकीतही ते सहभागी होऊ शकले नाहीत. सलग अडीच तास बसणे त्यांना शक्य नाही, अशी कबुली आरोग्य मंत्र्यांनीच(rajesh tope) दिली आहे. पूर्ण विश्रांती घेऊन ठाकरे लवकरच ठणठणीत बरे व्हावेत, अशी सदिच्छा निलंगेकरांनी(sambhaji nilangekar) दिल्या आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()