जुने अंमळनेर (ता.गंगापूर) शिवारातून वाहत असलेल्या गोदावरी नदीच्या काठावर जुने अंमळनेर गाव असून त्याची एक ओळख आहे. सध्या गोदावरी नदीचे पाणी झाले कमी झाले. त्यामुळे जुने अंमळनेरमधील नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या ‘इतिहासाच्या खुणा’ उघड्या पडल्या आहेत.
जायकवाडी धरण निर्मितीच्या आधी गोदावरी नदीकाठी एका उंच टेकडीवर अंमळनेर गाव होते. लोक गुण्यागोविंदाने येथे राहत होते. मात्र, १९७२ च्या भीषण दुष्काळानंतर जायकवाडी धरणाची निर्मिती झाली. पुढे जायकवाडी धरणात पाणी अडविल्यानंतर ३० जून १९७४ रोजी जायकवाडी धरणाचे पाणी जुने अंमळनेर गावात घुसण्यास सुरुवात झाली. महसूल आणि पोलिस विभागाने ग्रामस्थांना सुरक्षितस्थळी हलवले जे की आजचे नवीन अंमळनेर येथे.
गाव पूनर्वसित होण्याआधी
मारुती मंदिराचे बांधकाम चुनखडी, गोदावरी पात्रातील वाळूत मजबुतीचे मारुती मंदिर आजही साक्ष देत आहे. उत्तरेस मारुती मंदिराच्या पाठीमागे मलंगशा बाबा यांची दर्गा आणि नागेबाबा यांची समाधीदेखील होती. जे की उत्तरेकडून आल्यानंतर दक्षिणेकडे जातानी त्या ठिकाणी वास्तव्य केल्याची आख्यायिका आहे.
तसेच घटेशवर महादेव मंदिरालगतच गोदातीरी बिरोबाचे पुरातन मंदिर होते. तिथे विजयादशमीचा नवरात्र सोहळा भव्यदिव्य स्वरूपात पार पाडायचा. आणि गावाच्या पूर्वेस लक्ष्मीआई मंदिर, गारुडी बाबा मंदिर होते. गावाच्या मध्यभागी निजामकालीन भव्य दिव्य अशी पांढऱ्या मातीची गढी गावचे भूषण होते. मोहरममध्ये स्वाऱ्याच्या वेळेस त्या ठिकाणी चांदीचे नाल ठेवले जायचे. तेथेच बाजूला मस्जिद होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.