Gold and Silver : सराफा बाजारावर जागतिक घडामोडींचा परिणाम! सोने-चांदीचे दर पुन्हा गडगडले

सोन्या-चांदीच्या दरात सातत्याने चढउतार उतार होत असल्याचे चित्र आहे. कधी सोन्याच्या दरात वाढ होते, तर कधी घसरण पाहायला मिळत आहे.
Silver And Gold
Silver And Goldesakal
Updated on

छत्रपती संभाजीनगर - सोन्या-चांदीच्या दरात सातत्याने चढउतार उतार होत असल्याचे चित्र आहे. कधी सोन्याच्या दरात वाढ होते, तर कधी घसरण पाहायला मिळत आहे. मंगळवारी (ता. सहा) सोने व चांदीच्या दरात घसरण पहायला मिळाली.

सोन्याचे दर १ हजार २३९ रुपयांनी, तर चांदीचे दर ३ हजार ६९३ रुपयांनी झाले कमी झाले. चांदीचे दर आले ८२ हजार रुपयांवर, तर सोन्याचे दर ६९ हजार ६०० रुपयांवर पोचले. शेअर बाजारासह सराफा मार्केटवर जागतिक घडामोडींचा परिणाम दिसून आला. अमेरिकन अर्थव्यवस्थेत मंदीची शक्यता, इराण व इस्रायल युद्ध भडकण्याची भीती आणि बांगलादेशातील घडामोडींचा परिणाम बाजारावर दिसून आल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.

२२ व २४ कॅरेटमध्ये फरक असा

२४ कॅरेट सोने ९९.९% शुद्ध, तर २२ कॅरेट अंदाजे ९१% शुद्ध असते. २२ कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यासारख्या ९% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. २४ कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार २२ कॅरेटमध्ये सोने विकतात.

घरबसल्या जाणून घ्या दर

सोने-चांदीच्या किमती तुम्हाला घरबसल्याही जाणून घेता येतात. मात्र, त्यात स्थानिक कर, इतर करांचा भर पडतो. त्यामुळे शहरानुसार किमतीत तफावत दिसून येते. इंडियन बुलियन्स ॲण्ड ज्वेलर्स असोसिएशन (आयबीजेए) हे भाव जाहीर करते. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्या, शनिवारी आणि रविवार हे दिवस सोडून या किमती जाहीर करण्यात येतात. ग्राहक ८९५५६६४४३३ या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सर्व कॅरेटचे भाव जाणून घेऊ शकतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.