Lakshman hake : सरकार, विरोधकांकडून दिशाभूल सुरू.... प्रा. हाके : ओबीसी आरक्षण वाचविण्यासाठी सर्व घटकांनी एकत्र यावे

Obc Reservation : ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी सर्व घटकांनी संघटित होण्याचे आवाहन प्रा. लक्ष्मण हाके यांनी केले. औसा येथे झालेल्या मेळाव्यात त्यांनी सरकार आणि विरोधकांकडून ओबीसींची दिशाभूल होत असल्याचे सांगितले.
Laxman Hake
Laxman Hake sakal
Updated on

औसा : सत्ताधारी आणि विरोधक ओबीसी आरक्षणाला धक्का लागू देणार नाही, अशी भाषा करतात. दुसरीकडे हेच लोकप्रतिनिधी विशिष्ट जातीच्या मागणीचा विचार करत त्याला पाठिंबा दर्शवित ओबीसींची दिशाभूल करीत आहेत.

ओबीसी आरक्षण वाचण्यासाठी ‘एकच पर्व ओबीसी सर्व’ या नाऱ्याखाली सर्व ओबीसी भटके व विमुक्त जाती समूहाने संघटित शक्ती उभी करावी, असे आवाहन ओबीसी आरक्षण आंदोलनकर्ते प्रा. लक्ष्मण हाके यांनी केले आहे. औसा येथील मुक्तेश्वर मंगल कार्यालयात ओबीसी एल्गार मेळाव्यात रविवारी (ता. १३) ते बोलत होते.

यावेळी नवनाथ वाघमारे, हरिभाऊ गायकवाड, मंजूषा निंबाळकर, आदिवासी नेते रामराजे आत्राम, मुस्लिम ओबीसी संघटनेचे शब्बीर अन्सारी, गोपाळ बुरबुरे, प्रा. सुधीर पोतदार आदींची उपस्थिती होती. वाघमारे म्हणाले, ओबीसी समाजाचे सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक व राजकीय मागासलेपण कायम असल्यामुळे ओबीसी आरक्षण टिकणे अत्यंत गरजेचे आहे.

शब्बीर भाई अन्सारी यांनीही मार्गदर्शन केले. मेळाव्यात धनगर, माळी, बंजारा, वडार, गोंधळी, वासुदेव, जोशी, कुंभार, न्हावी, मसनजोगी, बंडी व धनगर यांच्यासह विविध समाजांचे नागरिक विशिष्ट समाजाची पारंपरिक वेशभूषा धारण करून सहभागी झाले होते. हजारो ओबीसी, भटके व विमुक्त यांच्यासह मुस्लिम, ओबीसी व दलित समाजातील नागरिक याप्रसंगी हजर होते.

प्रास्ताविक दत्तात्रेय घोगरे यांनी, तर सूत्रसंचालन राम कांबळे व गजेंद्र गिरी यांनी केले. मेळाव्याच्या यशस्वितेसाठी चांगदेव माळी, हनुमंत कांबळे, युवराज चव्हाण, अनिल जाधव, सचिन माळी, विशाल माळी, श्याम गोरे, एन.जी. माळी, ॲड. नितीन मेहत्रे, सुधाकर मेहत्रे, नारायण माळी, सुधाकर खडके, माणिकराव फुटाणे, गंगाधर विसापूर व नितीन बंडगर यांच्यासह तरुण ओबीसी कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.