कर्मचाऱ्याने विषारी औषध केले प्राशन, वैजापूर तहसीलमधील घटना

प्रेयसीचा खून, किनवट तालुक्यातील घटना
प्रेयसीचा खून, किनवट तालुक्यातील घटना
Updated on
Summary

काही क्षणातच त्यांनी खिशातून विषारी औषध प्राशन केले. कार्यालयातीलच कोतवाल भांडे यांनी बघितल्यानंतर त्यांना अटकाव करण्याचा प्रयत्न केला. परंतु तोपर्यंत उगले यांनी औषध प्राशन केले होते.

वैजापूर (जि.औरंगाबाद) : येथील तहसील कार्यालयाच्या Vaijapur Tahsil Office पुरवठा विभागातील कर्मचाऱ्याने विषारी औषध प्राशन करून कार्यालयातच आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना मंगळवारी (ता.२२) दुपारच्या सुमारास घडली. या घटनेमुळे महसूल विभागाच्या Revenue Department कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. दरम्यान सध्या या कर्मचाऱ्यावर शहरातील एका खासगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत. अव्वल कारकून मच्छिंद्र सुर्यभान उगले ( वय ५५) असे विषारी औषध प्राशन करणाऱ्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, येथील तहसील कार्यालयाच्या पुरवठा विभागातील अव्वल कारकून मच्छिंद्र उगले गेल्या Aurangabad काही वर्षांपासून कार्यरत आहेत. ते मंगळवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास कार्यालयात आल्यानंतर स्वतःशीच बोलू लागले. काही क्षणातच त्यांनी खिशातून विषारी औषध प्राशन केले. कार्यालयातीलच कोतवाल भांडे यांनी बघितल्यानंतर त्यांना अटकाव करण्याचा प्रयत्न केला. परंतु तोपर्यंत उगले यांनी औषध प्राशन केले होते. घटनेनंतर कार्यालयातील अन्य सहकाऱ्यांनी त्यांना तत्काळ शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. या घटनेमुळे महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून धोक्याबाहेर असल्याचे सूत्रांनी सांगितले. या प्रकरणी वैजापूर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. दरम्यान उगले यांनी आत्महत्येचा प्रयत्न का केला? याचे नेमके कारण मात्र समजू शकले नाही. परंतु असे असले तरी गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांची तहसीलदार राहूल गायकवाड Tahsildar Rahul Gaikwad यांनी पुरवठा विभागातून मका खरेदी केंद्रावर नियुक्ती केली होती. परंतु उगले यांना ही नियुक्ती मान्य नव्हती. असाही एक सूर कर्मचाऱ्यांमधून ऐकावयास मिळत आहे. दुसरीकडे त्यांना मधुमेह असल्यामुळे त्रास होत होता. त्यामुळे ते २१ व २२ जून रोजी सुटीवर असल्याचे बोलले जात आहे. government employee consume poison in vaijapur tahsil marathi news

प्रेयसीचा खून, किनवट तालुक्यातील घटना
आमदार प्रदीप जैस्वाल यांना जामीन मंजूर

मी आज दिवसभर दौऱ्यावर होतो. आताच तहसील कार्यालयात पोहोचल्यामुळे नेमके काय झाले व कशावरून झाले? याची माहिती मलाही नाही. मात्र घटना कार्यालयात घडली. एवढेच समजले. पुरवठा विभागातून उगले यांची नियुक्ती मका खरेदी केंद्रावर करण्यात आली होती. तसे आदेशही मी काढले होते. परंतु ते शासकीय कर्तव्य आहे. त्या कारणामुळे असे कृत्य करणे योग्य नाही. चौकशी केल्यानंतरच खरा काय प्रकार आहे? ते समजेल.

- राहूल गायकवाड, तहसीलदार, वैजापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.