औरंगाबाद : शासनाचा महसूल बुडविला; बारा जणांविरोधात गुन्हा

तीसगाव येथील गौण खनिज चोरी करून करोडो रुपयांना चुना
 Crime against twelve people
Crime against twelve peoplesakal
Updated on

वाळूजमहानगर : वाळूज परिसरातील तीसगाव येथील स्टोन क्रेशरधारक व गौण खनिज चोरी करून करोडो रुपयांचा महसूल बुडविल्याप्रकरणी १२ धनाढ्य आरोपी विरोधात अपर तहसीलदारांच्या आदेशानुसार मंडळ अधिकाऱ्यांच्या फिर्यादीवरून शनिवारी (ता.१२) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वाळूज परिसरातील तीसगाव गट क्रमांक २२५/२६, २२५/४१, २२५/४४, २२५/४६, २२५/४७, २२७/१ मधील खदाणीचे अवैध व विनापरवाना उत्खनन करून मोठ्या प्रमाणात गौण खनिज चोरी केल्याचे उघडकीस आले होते. त्यामुळे भुविज्ञान व खनिकर्म संचलनालयाच्या पथकाने या दगड खाणीचे १२ डिसेंबर २०१५ ते २१ डिसेंबर २०१५ रोजी इटिएस मोजणी केली. त्यानुसार अवैद्य उत्खनन केलेल्या खणीपट्टा धारकाकडून महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ चे कलम ४८ (७) (क) मधील तरतुदीनुसार दंडाची रक्कम वसुलीबाबत कळविले.

त्यानुसार तत्कालीन अप्परतहसील औरंगाबाद यांनी ३ डिसेंबर २०१६ रोजी संबंधितास दंडाची नोटीस देऊन १३ डिसेंबर २०१६ रोजी सुनावणीस अप्परतहसील कार्यालय औरंगाबाद येथे लेखी म्हणण्यासह हजर राहण्याबाबत सूचित केले होते. नसता विरुद्ध दंडात्मक कार्यवाही करुन सदर रक्कम कलम १७४ प्रमाणे जमीन महसुल म्हणून वसुल करण्यात येईल, अशी सूचना दिली होती. तसेच त्यानंतरही त्यांना वेळोवेळी नोटीस देऊन सूचीत करण्यात आले होते. यानंतर तत्कालीन अप्पर तहसीलदार यांनी त्यांच्या कार्यालयात प्रकरण चालवून दंडाचे आदेश पारित केले आहे. तरीही आजपर्यंत संबंधितांनी थकबाकीची रक्कम शासनखाती जमा केले नाही. त्यामुळे मंडळ अधिकारी लक्ष्मण गाडेकर यांच्या फिर्यादीवरून वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात शनिवारी (ता.१२) गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांमध्ये पी. एम. चोरडीया, जसपालसिंग ओबेराँय,

सतिंदरसिंग ओबेराँय, सुभाष कनिसे, विनोद पटेल, महालक्ष्मी स्टोन क्रेशर, शिल्पा शर्मा, रवी कसुरे, शेख एजाज, आसाराम तळेकर, सिध्दार्थ दिपके, अजय स्टोन क्रेशर, जयपालसिंग ग्रंथी ऊर्फ रोमीसेठ, मिलिंद थोरात यांचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.