दिलासा! कोरोना मृत्यूदराला ‘ब्रेक’, अकरा दिवसांत पाच मृत्यू

आधी २.४३ आता २.४० टक्के मृत्यूदर ; अकरा दिवसांत वाढले २ हजार १५२ रूग्ण
corona update
corona updatesakal Media
Updated on

औरंगाबाद : कोरोना संसर्गाचा(corona update aurnagabad) वेग जास्त असला तरी दिलासादायक बाब म्हणजे, सहव्याधीसह कोरोना या प्रमुख कारणामुळे होणाऱ्या मृत्यूदराला काहिसा ‘ब्रेक’ (death rate )लागला आहे. गेल्या अकरा दिवसांत पाच मृत्यू झाले व २ हजार १५२ जण कोरोनाबाधित आढळले असून याचा विचार केल्यास अकरा दिवसांत ०.२३ टक्के मृत्यू झाले.

corona update
DRS वर विराट भडकला, फिल्ड अंपायरची धक्कादायक रिअ‍ॅक्शन

पहिल्या व दुसऱ्या लाटेत अशाच काळात दरदिवशी सहा ते आठ मृत्यू होत. पहिल्या लाटेत मृत्यूदर पाच टक्क्यांपेक्षा अधिक होता. त्यानंतर दुसऱ्या लाटेत तो साडेतीन टक्क्यांवरून पावणेतीन ते अडीच टक्क्यांवर स्थिरावला. त्यानंतर या अकरा दिवसांत रूग्णवाढ झाली पण मृत्यूदरात मोठी घट दिसून आली. १ जानेवारीपर्यंत रूग्णसंख्या प्रतिदिन अगदी नगण्य (पंचवीशीच्या दरम्यान) होती. १ ते १२ जानेवारी या अकरा दिवसांत २ हजार १२५ रूग्ण वाढले. सरासरीचा विचार करता दरदिवशी १९५ रूग्ण बाधित आढळले. १ जानेवारीपूर्वी मृत्यूदर २.४३ टक्के होता. त्यात ०.३ टक्के घट झाली व तो सध्या २.४० टक्के इतका आहे. ही दिलासादायक बाब असून मृत्यू व मृत्यूदर कमी झाला आहे.

corona update
जळगाव : आंतरजातीय विवाह करणाऱ्या दांपत्यांचा छळ

आकडे बोलतात.....

  1. १ जानेवारीपर्यंत रूग्ण - १,४९,८६४

  2. १२ जानेवारीपर्यंत रूग्ण - १,५२,०१६

  3. ११ दिवंसात २ हजार १५२ रूग्ण

  4. दरदिवशी सरासरी १९५ रूग्ण बाधित

  5. २ जानेवारीपूर्वी मृत्यूदर - २.४३

  6. सध्याचा मृत्यूदर - २.४०

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.