पाण्यासाठी सिडकोत पुन्हा भडका; पाणीपुरवठा कार्यालयावर हंडा मोर्चा

सायंकाळी या भागात पाणी पुरवठा करण्यात आला.
aurnagabad
aurnagabad sakal
Updated on

औरंगाबाद : सिडको परिसरात (cidco area) पाण्याची बोंबाबोंब सुरूच असून, दोन दिवसांपूर्वी एन-७ भागातील सी-१, सी-२ येथील नागरिकांनी पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना(Water Supply Department) घेराव घातला होता. त्यानंतर आज गुरुवारी (ता.२०) अयोध्यानगर भागातील नागरिक, महिलांनी पाण्यासाठी हंडे वाजवून चार तास ठिय्या आंदोलन केले. प्रशासक आस्तिककुमार पांडेय(astikkumar pandey) यांनी फोनवरून आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली व तोडगा काढण्याचे आश्‍वासन दिले. त्यानंतर दुपारी एक वाजता आंदोलन मागे घेण्यात आले. दरम्यान सायंकाळी या भागात पाणी पुरवठा करण्यात आला.

aurnagabad
कारच्या धडकेत भारतीय जवान ठार, धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील घटना

सिडको भागात उन्हाळ्यापूर्वीच पाण्यासाठी आंदोलने सुरू झाली आहेत. एन-७ भागातील सी-१, सी-२ या गल्ल्‍यांना सात दिवसानंतरही पाणी न मिळाल्याने मंगळवारी (ता. १८) महिलांसह नागरिकांनी सिडकोतील पाणी पुरवठा कार्यालयावर धाव घेऊन अधिकाऱ्यांना घेराव घातला होता. हा प्रकार ताजा असतानाच गुरुवारी आयोध्यानगर भागातील नागरिक रस्त्यावर उतरले. या भागातील चार गल्ल्यांमध्ये अनेक महिन्यांपासून नागरिकांना पाणी टंचाईचा त्रास सहन करावा लागत आहे.

aurnagabad
ट्रक-कारच्या अपघातात एक जखमी, धुळे-सोलापूर महामार्गावरील घटना

नळाला अपुरे पाणी येत नसल्याने नागरिकांनी वारंवार प्रशासनाकडे तक्रारी केल्या. आठ महिन्यांपासून विविध ठिकाणी खोदकाम करून पाइपलाइनची तपासणी केली जात आहे. पण अद्यापपर्यंत प्रशासनाला तोडगा काढता आलेला नाही. गुरुवारी या भागात पाण्याचा दिवस होता. पण पाणी न आल्याने माजी नगरसेवक शिवाजी दांडगे, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे रवी तांगडे, राहुल खरात यांच्यासह नागरिक, महिला हंडे घेऊन सकाळी १० वाजता पाणी पुरवठा कार्यालयावर जमा झाले. याठिकाणी केवळ दोनच कर्मचारी हजर होते. उपअभियंता अशोक पदमे सुट्टीवर असल्याचे या कर्मचाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे दांडगे यांनी आमदार अतुल सावे यांच्याशी संपर्क साधून माहिती दिली.

सावे यांनी प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांना फोन केला. त्यानंतर श्री. पांडेय यांनी पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता किरण धांडे यांना पाठवून प्रश्‍न मार्गी लावला जाईल, असे आश्‍वासन नागरिकांना फोनवरून दिले. पण किरण धांडे जायकवाडीला गेले होते. त्यामुळे प्रशासकांच्या आश्‍वासनानंतर नागरिकांनी दुपारी एक वाजता आंदोलन मागे घेतले. दरम्यान सायंकाळी साडेपाच वाजता या भागात पाणी पुरवठा करण्यात आल्याचे श्री. दांडगे यांनी सांगितले. आंदोलनात सतीश खेडकर, कैलास राऊत, श्री. नेमाने, श्री. जैस्वाल, श्रीमती पाटील, श्रमती कुलकर्णी, वासुदेव खंडारे, बबन वाडेकर, मधुकर बावीस्कर, आनंदराव निकम, सतीश खेडकर यांच्यासह इतर सहभागी झाले होते.

...अन्यथा गुन्हे दाखल करू

गेल्या आठ महिन्यांपासून प्रशासनाला या भागातील पाण्याची समस्या सोडविता आली नाही. यापूर्वी पाण्यासाठी आंदोलने केली तेव्हा प्रशासनाने आमच्यावर गुन्हे दाखल केले. आता प्रशासकांच्या आश्‍वासनानंतरही या भागातील पाण्याचा प्रश्‍न मिटला नाही तर आम्ही प्रशासनाच्या विरोधात पोलिसांत तक्रार देऊ, असा इशारा शिवाजी दांडगे यांनी यावेळी दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.