'केंद्राने कायदा करून मराठा समाजाला आरक्षण द्यावं, अन्यथा भाजप खासदारांना ठोकणार'

मराठा समाजाचे आरक्षण सर्वोच्च न्यायलयाने रद्द केल्यानंतर गुरुवारी (ता.६) माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी प्रसार माध्यमासमोर त्यांची भूमिका मांडली
harshvardhan jadhav
harshvardhan jadhavharshvardhan jadhav
Updated on

औरंगाबाद: सर्वोच्च न्यायालयाने (supreme court) मराठा आरक्षण (maratha reservation) रद्द ठरवल्यापासून मराठा समाज राज्य सरकारसोबत केंद्र सरकारवर मोठा नाराज झाला आहे. माजी आमदार हर्षवर्धन जाधव (harshvardhan jadhav) यांनी गुरुवारी (ता.६) पत्रकार परिषदेत संतप्त प्रतिक्रिया दिली. पत्रकार परिषदेत जाधव म्हणाले की, मराठा समाजाला आरक्षण द्यायचे असेल तर कायदा करावाच लागेल. कायदा करण्याचे काम हे संसदेच्या हातात आहे. यामूळे आता केंद्र सरकारने कायदा करीत समजाला आरक्षण मिळवून द्यावेत. यासाठी भाजप खासदारांनी पुढाकार घ्यावा, त्यांनी जर असे केले नाही, तर समाज त्यांना ठोकणार.

harshvardhan jadhav
इंदोरीकरांच्या अडचणीत वाढ, वादग्रस्त विधान केल्याप्रकरणात खंडपीठाने बजावली नोटीस

मराठा समाजाचे आरक्षण सर्वोच्च न्यायलयाने रद्द केल्यानंतर गुरुवारी (ता.६) माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी प्रसार माध्यमासमोर त्यांची भूमिका मांडली. हर्षवर्धन जाधव म्हणाले की, मराठा समाजासाठी राजीनामा दिल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आरक्षण जाहीर करून फेटे बांधून फटाके फोडले होते तेव्हाच जाणवलं होतं की टिकणारा आरक्षण नव्हते. यासाठी कायदा करावा असे मी वारंवार सांगत होतो. पण माझे कोणी ऐकलेच नाही. असेही हर्षवर्धन जाधव म्हणाले.

harshvardhan jadhav
फक्त एक इंचाचे दुर्मिळ कुराण शरीफ! वाचण्यासाठी करावा लागतो भिंगाचा वापर

'कायदा करण्याचे काम संसदचे आहे, सुप्रीम कोर्टाचे नाही. काही लोक म्हणतात की राज्यापुरता कायदा कसा होऊ शकतो, जर काश्मीरसाठी केंद्र सरकारनेच ३७० चा कायदा करु शकते, ईशान्य भारतातील त्रिपुरा, मिझोरम या राज्यांनाही विशेषाधिकार देऊ शकते, महाराष्ट्रात वैधानिक महामंडळाची स्थापना करु शकते मग महाराष्ट्रासाठी कायदा करु शकत नाही का? यामूळे महाराष्ट्रापुरता कायदा करणे बोलणं चुकीचे ठरेल,' असेही जाधव म्हणाले.

harshvardhan jadhav
'मराठा आरक्षणासंदर्भात 'पुनर्विलोकन याचिका' दाखल करणार'

कायदा होत नसेल तर, भाजप खासदारांनी राजीनामा द्यावा

केंद्रात भाजपचे ३०० हून अधिका खासदार आहेत. यामूळे आता भाजपच्या खासदारांनी मराठा आरक्षणासाठी कायदा करावा, ते करणार नसतील तर मराठा समाज त्यांना बघून घेईल. समाजासाठी भाजप कायदा करत नसेल, तर त्या खासदारांनी राजीनामा द्यावा. मराठा आरक्षणाच्या निकालाकडे समाजातील मुले अपेक्षेने बघत होती, मुलांचे व्यवसाय, शिक्षण यावर अवलंबून होते. गेल्या वेळी आरक्षणासाठी ५० हून अधिक मुलांनी आत्महत्या करत बलिदान दिले. आता पुन्हा तसे झाल्यास त्यांना कोण थांबवणार? यामुळे आता भाजप खासदारांनी समाजासाठी कायदा करावा, 'आम्ही चकवा बहादूर आहोत, आम्ही कोणालाही चकवा देऊ शकतो असे चालणार नाही, असे जे खासदार करेल त्याला मराठा समाज ठोकणार असेही हर्षवर्धन जाधव म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.