कन्नड (जि.औरंगाबाद) : राजकारण सोडून शांत जीवन जगण्यासाठी पुणे येथे गेलो, तेथेही चुकीचे गुन्हे नोंदवून. मला संपवण्याचा डाव असल्याने मी आता परत राजकारणात येणार आहे. जालना लोकसभेत रावसाहेब दानवे यांना पाडले नाही तर हर्षवर्धन नाव वापरणार नसल्याचे घणाघाती टीका माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी कन्नड येथे मंगळवारी(ता.नऊ) केली.
पुणे येथील कारागृहातून जामिन मिळाल्यानंतर मंगळवारी श्री.जाधव यांनी सहकारी इशा झा यांच्यासह शहरातील शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद घेतली. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री खासदार दानवे यांच्यावर टीका करताना ते म्हणाले की, पुणे येथील घटनेत खासदार दानवे यांच्या दबावात पोलिसांनी चुकीचा गुन्हा नोंदवला. मात्र माननीय उच्च न्यायालयाने सदर गुन्हा चुकीचा असल्याचे म्हटल्याने मला जामिन मिळाला. या आधीही माझ्या विरोधात खासदार दानवे यांनी चुकीचा अॅट्रोसिटी गुन्हा दाखल केला होता.
नंतर वाद भांडण नको म्हणून मी राजकारण सोडून शांततेत समाज कार्य करण्याचे ठरवले होते. मात्र खासदार दानवे हे मला जगू देत नाही. त्यामुळे आता मी पुन्हा राजकारणात येऊन रावसाहेब दानवेंना जालना लोकसभेत पाडल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. आणि येत्या १८ तारखेपासून मी पुन्हा राजकारणात येण्याची सुरुवात करणार आहे. त्या दिवशी तालुक्यात विजयी सरपंच व उपसरपंच यांचा सत्कार करणार आहे.
आपल्या पत्नी संजना जाधव यांच्यावर टीका करताना ते म्हणाले की, एखाद्या महिलेने त्याच्या पतीशी वाद असल्यास त्याच्या विरोधात राजकारण केल्याचे मी बघितले आहे. मात्र,एखाद्या महिलेने आपल्या मुलाच्या विरोधात पॅनल उभे केल्याचे मी बघितले नाही. कन्नड तालुक्यातील झळकणाऱ्या बॅनरवरून संजना जाधव यांची राजकीय इच्छा लपून राहिलेली नाही. पती जेलमध्ये असताना या महिलेने मुलाविरोधात पॅनल टाकले. कशासाठी हा अट्टहास तर आमदारकीसाठी तोंडाने मागितली असती तर देऊन टाकली असती.
एवढा खटाटोप कशासाठी. हर्षवर्धन जाधव म्हणाले की, खासदार दानवे यांनी विधानसभेत मला पाडण्यासाठी तात्कालीन मंत्री लोणीकर यांच्या जावयाला उभे केले. त्यामुळे मी पडलो. निवडून आलेल्या आमदारांचा प्रशासनावर वचक नसल्याने, तलाठी, ग्रामसेवक, पोलिस, तहसिलदार कोणीच काही ऐकत नाही. त्यामुळे खासदार दानवे यांनी माझेच नाही तर तालुक्याचेही नुकसान केले आहे.
संपादन - गणेश पिटेकर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.