औरंगाबाद: ढगफुटी, गारपीट, वीज पडल्याने लागलेली आग असो, वा शेतीत पाणी साचणे यासारख्या स्थानिक नैसर्गिक आपत्ती या जोखमीच्या बाबीअंतर्गत शेतकऱ्यांनी पीकविमा कंपनीकडून लाभ व्हावा यासाठी शेतकऱ्यांनी पीकविमा भरला आहे. अशा घटनांमुळे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांनी घटना घडल्यापासून ७२ तासांच्या आत वैयक्तिकरीत्या मोबाइल ॲपद्वारे पीकविमा कंपनीला कळवावे असे आवाहन विभागीय कृषी सहसंचालक दिनकर जाधव यांनी केले आहे.
सर्वदूर मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे. काही तालुक्यांत, मंडळात, गावांमध्ये अतिवृष्टी होऊन सतत पाऊस पडल्याने पेरणी केलेल्या पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. ज्या ठिकाणी अतिवृष्टी किंवा हवामान घटकांची प्रतिकूल परिस्थिती उद्भवली, पिकांचे नुकसान झाले असेल तर संबंधित शेतकऱ्यांनी विमा कंपनीला कळवावे. तसेच अर्जाची एक आगावू प्रत तालुका कृषी अधिकारी कार्यालयास द्यावी, असे आवाहनही जाधव यांनी केले आहे. त्याचबरोबर अधिक माहितीसाठी तालुका कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या कार्यालयास संपर्क साधावा. पिकाचे नुकसान कळवताना सर्व्हे नंबर, नुकसानीचे क्षेत्र तसेच पिकांचे फोटो आदीची माहिती देणे बंधनकारक आहे. ही माहिती पाठविण्यासाठी विमा कंपन्याचे टोल फ्री क्रमांक व इतर माहिती कृषी विभागाच्या कार्यालयात उपलब्ध आहे, असेही श्री. जाधव यांनी याबाबतच्या आवाहनात म्हटले आहे.
येथे संपर्क करा -
औरंगाबाद जिल्ह्यासाठी एचडीएफसी इर्गो इन्शुरन्स कंपनी – १८००२६६०७००, मेल pmfby.maharashtra@hdfcergo.com
जालना जिल्ह्यासाठी - रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी. लि.-१८२२१०२४०८८ मेल - rgcl.pmfby@relianceada.com
बीड जिल्ह्यासाठी भारतीय कृषी विमा कंपनी लि.-१८००४१९५००४ मेल mhabcis@aicofindia.com
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.